मुंबई : दहिसर येथे काल भाजप कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. वारे यांच्यावर हल्ला इतका गंभीर आहे की त्यात त्यांना २१ टाके पडले आहेत. मात्र, तरीही पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही. साधी घटना म्हणून नोंद करत आहेत. ही परिस्थिती भाजपवर का आली आहे, याचा कधीतरी विचार करा. काही महिन्यांपूर्वी शिंदे गटाचा एक आमदार खुलेआम मारण्याची भाषा करतो. तुम्ही बिनधास्त घुसा मी टेबल जमीन देतो म्हणत होता. आम्ही त्यावेळी कारवाई करण्याची मागणी करत होतो, असे सांगत शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी तेव्हा दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती भाजपवर आली आहे. त्यामुळे काल आम्ही जात्यात होतो. आज भाजप जात्यात आली आहे, असा इशाराच दिला आहे.
Old Pension साठी समिती स्थापन करणार; CM शिंदेंची विधानसभेत महत्वाची माहिती!
अनिल परब म्हणाले की, आज राज्यात भाजपची सत्ता आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपचेच आहेत. तरीदेखील भाजपचे कार्यकर्ते मार खात आहेत. ही परिस्थिती का उदभवली याचा तुम्ही विचार करणार आहे की नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नाही. पण काळ सोकावला नाही पाहिजे. परंतु, आज भाजपवर ही वेळ का आली. त्याचे कारण भाजपने शिंदे गटाला डोक्यावर बसवून घेतले आहे. त्यामुळे परिणाम भोगावे लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर यांच्यावर कोणत्याच प्रकारचा वचक राहणार नाही. त्यामुळे संबंधित पोलिसांवर कोणाचा दबाव आहे. त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करा. अन्यथा, यापुढे ही लोकं खुलेआम कोयता, तलवारी घेऊन कोणालाही मारत सुटतील. त्यांच्यावर कोणाचाच वचक राहणार नाही. पोलिसांनी कायद्याच्या वापर करून कडक भूमिका घ्यावी.
काही महिन्यांपूर्वी दहिसरमध्ये पहिल्यांदा मारहाण झाली. त्यावेळी तो आमदार खुलेआम कार्यकर्त्यांना म्हणत होता. चिथावत होता. बिनधास्त हातपाय तोडा. मी लगेचच टेबल जामीन करून देतो. आम्ही त्याचवेळी कारवाईची मागणी केली होती. परंतु, तेव्हा दुर्लक्ष केल्यानेच गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मार खायची वेळ आली आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने पहा. अन्यथा तुम्ही ज्यांना बरोबर घेतले आहे. तेच तुमच्या डोक्यावर बसतील, असा इशाराही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनिल परब यांनी दिला.