मुंबई : आमदार अनिल परबांचं अर्ध रिसॉर्ट तोडलं, बाकी ईडीने ताब्यात घेतलं, आता कार्यालयही गेल्याने त्यांच्याविषयी मला वाईच वाटत असल्याचं खोचक विधान भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलंय. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आलं आहे. परबांचं कार्यालय तोडल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडाच्या कार्यालयात गोंधळ घातला आहे. अखेर सोमय्या-परब वाद चिघळल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
सोमय्या म्हणाले, लोकायुक्तांच्या सुनावणीत झालेल्या निर्णयाचं पालन म्हाडाने केल्याचं सोमय्यांनी म्हटलंय. मात्र, आता कारवाई झाल्यानंतर परबांना मराठी माणूस आठवला आहे. 2 सप्टेंबर 2021 ला अनिल परबांचं कार्यालय अनाधिकृत ठरवण्यात आल्याचं सोमय्यांनी म्हंटलंय. मात्र, त्यावेळी उध्दव ठाकरेंच्या आशिर्वादाने त्यांचं कार्यालय वाचलं होतं. आता मात्र, ईडीने त्यांच्या रिसॉर्टवर कारवाई केली. आता म्हाडानेही त्यांच्या बांद्रा इथल्या कार्यालयावर कारवाई करण्यात आलीय. महाविकास आघाडीच्या नेते ‘चोर मचाये शोर’ असं काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
तसेच अनिल परबांच्या कोकणातील रिसॉर्टमध्ये त्यांनी चार कोटी घेतल्याने परबांना तुरुंगात राहायची वेळ आली होती. प्रताप सरनाईक भ्रष्टाचारी आहेत, असं उध्दव ठाकरे म्हणताहेत पण त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे होते. तेव्हा सरनाईक त्यांचे पार्टनर होते का? असा सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
जर सरनाईक भ्रष्टाचारी नेते होते तर त्यासंदर्भातील पुरावे तुम्ही सादर करा, असं आव्हानही त्यांनी उध्दव ठाकरेंना दिलंय. ज्यावेळी सचिन वाझेंशी 100 कोटींचा व्यवहार ठाकरे करत होते तेव्हा ही गोष्ट नाही समजली का? असा सवालही त्यांनी केलाय.
दरम्यान, शिवसैनिकांनी वांद्रे इथल्या म्हाडा ऑफिसच्या समोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडाच्या कार्याल्यात गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या-अनिल परब यांचा वाद चांगलाच चिघळलाय. तर दुसरीकडे अनिल परबांकडून म्हाडाकडून मला कार्यालयासंदर्भात पाठवण्यात आलेली नोटीस मागे घेण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.