Anna Hajare : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना काही दिवसापूर्वी श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली होती. शेतीच्या वादामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला नाही म्हणून संतोषने अण्णा हजारेंना आपण जीवे मारणार आल्याची धमकी दिली होती. या इसमाला पोलिसांनी आज श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती नाशिकचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिली.
शेतीच्या वादामध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करून आपल्याला न्याय द्यावा यासाठी गायधने यांनी अण्णा हजारे यांना निवेदन दिलं होतं. तसेच प्रशासनालाही त्यांनी निवेदन दिलं होतं. मात्र, निवेदन देऊन देखील पदरी निराशा आली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परीवारावर दबाव आणला. खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने मागील अनेक दिवसांपासून माझं कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगत आहे. शेतीच्या वादात आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळेच आम्ही अण्णांकडे गेलो होतो, अशी व्यथा संतोष गायधने यांनी मांडली आहे.
विधवा महिलांना मिळणार नवी ओळख, राज्य सरकारच्या हालचाली सुरु…
दरम्यान गायधने यांनी अण्णा हजारे यांच्याकडे मी मदतीची मागणी केली होती, परंतु अण्णांनी माझ्या निवेदनाची दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी करत 1 मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची मी हत्या करणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान प्राप्त माहीतीनुसार, त्यांनी राष्ट्रपती महोदयांकडे इच्छामरणाची याचिका दाखल केली आहे. आम्हाला न्याय देणं शक्य नसेल तर आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी याचिका दाखल केली आहे.
2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांना येणार ‘एवढ्या’ जागा?
या सर्व प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अण्णा हजारे यांनी याबाबत आपणास कोणतीही माहिती नसून बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.