Ashok Kharat : बहुचर्चित भोंदू अशोक खरातचे (Ashok Kharat) रोजन नवनवीन कारनामे समोर येत असल्याचं दिसून येत आहे. महिलांचं शोषण, अर्थिक गंडा यांसह इतर अनेक गुन्ह्यात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातचा आणखीन एक नवीन कारनामा समोर आलायं. अशोक खरातची मुलगी सृष्टी खरात हिच्या नावे पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनीमध्ये 3 BHK फ्लॅट असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे हा फ्लॅट खरेदी करताना खरातने बिल्डरला कॅश स्वरुपात 1 कोटी 20 लाख रुपये दिल्याचंही समोर आलंय. त्यामुळे आता या खरातकडे एवढे पैसे आले तरी कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे विद्यापीठाच्या उत्तर पत्रिका खरंच पावसात भिजल्या का? विद्यार्थ्यांचा आरोप अन् प्रशासनाचे उत्तर
महिलांंचं शोषण आणि उद्योजकांना गंडा घातल्याचे गुन्हे अशोक खरातवर दाखल आहेत. तर दुसरीकडे दर दिवस त्याच्याविरोधात अनेक तक्रारी समोर येतआहेत. अशातच आता पुण्यातल्या उच्चभ्रू भागातील मॉडेल कॉलनी परिसरात 24 रत्नम सोसायटीमध्ये मुलगी सृष्टी खरातच्या नावे 3 bhk फ्लॅट आहे. हा फ्लॅट 1055 स्वेकअर फुट असून फ्लॅटचा व्यवहार हा पूर्णपणे कॅशमध्ये झाला असल्याचं समोर आलं आहे. या फ्लॅटची खरेदी 13 सप्टेंबर 2023 रोजी झालीयं.
“प्राजक्तराज” आता “प्राजक्तसाज”; मोठी घोषणा करत प्राजक्ता माळीने बदलली ज्वेलरी ब्रॅण्डची ओळख
अशोक खरात याची संपूर्ण राज्यात आणि पुण्यात कोट्यावधींची संपत्ती उघड झाली आहे. खरात याच्या संपर्कात राज्यातील अनेक आमदार आणि बडे नेते असल्याचंही उघड झालंय. यासोबतच उच्चपदस्थ अधिकारी वर्गदेखील अशोक खरातकडे जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता खरातकडे आलेला पैसा नेमका कोणाचा याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे.
मुलासमोरच बापाची चौकशी होणार..
मागील अनेक दिवसांपासून अशोक खरातची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीदरम्यान, खरात पोलिसांना सहकार्य करत नाहीये. कुठलीही स्पष्ट माहिती तो देत नसल्याने तपासात पुढे जात नाही. खरातकडून माहिती घेऊन पत्नीला अटक करण्याचं पोलिसांचं टार्गेट आहे, मात्र त्याआधीच पत्नी कल्पना फरार झाल्याने पोलिसांचा संशय वाढलायं.शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणात खरातची पत्नी कल्पना खरातवरही गुन्हा दाखल करण्यात आलायं. एसआयटीचे पथक खरातच्या घरी गेले असता पत्नी कल्पनाने धूम ठोकलीयं. त्यामुळे घरी असलेला खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतलंय.
खरात साहेब जे बोलतात तेच घडतं; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकातून धक्कादायक दावे
