Ashok Kharat case victim showed the video to the MLA but he saved Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. अगोदर एका महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर आता त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी अनेक महिला समोर आल्या आहेत. दरम्यान, आता याच अशोक खरातविरोधात लैंगिक शोषणाचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याभोवती कारवाईचा फास अधिक आवळला जात आहे. असं असतानाच आता भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग नेमकं फुटलं कसं? याची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग नेमकं फुटलं कसं?
भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग नेमकं फुटलं कसं? याची एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. भोंदुला अटक होण्याअगोदरच त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे खरातवर कारवाई करण्यासाठी पिडितेने एका आमदाराची भेट घेतली होती. त्याला खरातचे व्हिडीओ दाखवले होते. विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती देखील केली. मात्र त्यांनी त्यावर कारवाईचे आदेश देण्याऐवजी हे व्हिडीओ खरातलाच दाखवले.
सातारा झेडपीतील खडाजंगीवर रात्री उशीरा बैठक, फडणवीसांकडून शिंदेजवळ नाराजी व्यक्त; वाद शमणार की…
त्यानंतर खरातने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्याबद्दल चुकीची माहिती आणि बदनामीच्या उद्देश्याने हे व्हिडीओ दाखवले जात असल्याचा दावा करत खरातने पिडीतेच्या पतीवरच गुन्हा दाखल केला. त्यानंतर देखील पिडीतेने हार मानली नाही. त्यांनी दुसऱ्या आमदाराची भेट घेतली आणि त्यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवल्यानंतर सुत्र हालली.मात्र भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचं बिंग नेमकं फुटलं कसं? याची ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर खरातला वाचवणारा हा आमदार नेमका कोण? या चर्चांना उधान आले आहे.
