65 बनावट खाती, 52 कोटींचा व्यवहार अन् परदेशात पलायन; भोंदू खरातच्या डोक्यात नक्की काय होतं?

काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये, यासाठी बँकिंग नियमातील २ लाख मर्यादेची पळवाट देखील खरातने शोधली होती.

Ashok Kharat

Ashok Kharat

Ashok Kharat : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आलायं. अशोक खरात याला अटक करण्यापूर्वी त्याने बनावट खात्यातून संशयास्पद व्यवहार केल्याची माहिती चौकशीत समोर आलीयं. खरातने तीन महिन्यांत बनावट खात्यांमधून तब्बल 52 कोटी रुपये काढून परदेशात पळून जाण्याचा प्लॅन होता, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झालीयं.

NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त, काय घडलं?

एवढंच नाही तर काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये, यासाठी बँकिंग नियमातील २ लाख मर्यादेची पळवाट देखील खरातने शोधली होती. कोपरगावच्या एकट्या समता पतसंस्थेत ६५ बनावट खाती उघडून जानेवारीत चार दिवसात २०० हून अधिक व्यवहारांद्वारे ५२ कोटी रुपये काढून त्याचा परदेशात पलायनाचा प्लॅन असल्याचं देखील उघड झालं आहे. या बनावट खात्यांमध्ये दोन महसूल आणि दोन आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावे तसेच चाकणकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांच्या नावेही खाती असल्याची माहिती समोर आलीयं.

सुत्रांच्या माहितीनुसार खरातला पोलिसांच्या अटकेची दाट शक्यता वाटू लागली होती. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची जय्यत तयारी केली होती. खरातचे परदेशात अनेक संबंध असल्याने तिथे स्थायिक होऊन पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा त्याचा प्रयत्न होता. SIT कडे तपासास असलेल्या एकूण ११ गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे एकूण ८ गुन्हे आहेत. तसेच फसवणूकीचा १ गुन्हा आहे.

अशोक खरात याने साक्षीदारांविरूद्ध खोटा खंडणीचा १ गुन्हा दाखल केला होता. अशोक खरात याने फिर्यादीवर दबाव टाकून साक्षीदाराविरूद्ध १ गुन्हा दाखल केला होता, असे २ गुन्हे आहेत. उर्वरित ८ गुन्ह्यांचा तपास संबंधीत घटक करत आहेत. अशोक खरात विरूद्ध दाखल असलेल्या एकूण गुन्हयांपैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. तसेच उर्वरित ९ गुन्हे हे फसवणूक सह अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ व इतर या प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

चार टँकर मागितले तर दोनच मिळतात; पुण्यात इंधनपुरवठ्यावर निर्बंध, नागरिकांकडून घाईघाईत इंधन खरेदी

महिला लैंगिक अत्याचाराचे सर्व ८ गुन्हे व फसवणुकीचा १ गुन्हा SIT तपास करीत आहे. आजपर्यंतच्या तपासा दरम्यान १०५ पेक्षा अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे व पीडितांकडे केलेल्या चौकशीतून आरोपी हा पीडित व्यक्ती व कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, भीती दाखवून, खडे, चिंचुके, रूद्राक्ष, पुजा, विधी आदी माध्यमातून त्यांचेकडून पैसे उकळत होता, तसेच महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. तसेच ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये, हात चलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत होता, याबाबत आरोपी विरोधात मौखिक, भौतिक, दस्तऐवजी, परिस्थितीजन्य, इलेक्ट्रॉनिक पुरावा असे पुरावे प्राप्त झाले आहेत.

Exit mobile version