Download App

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, 15.62 कोटीच्या अनुदानाची रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात

Ashutosh Kale : कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या महागाईत राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारकडून या निर्णयाची

  • Written By: Last Updated:

Ashutosh Kale : कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या महागाईत राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 15.62 कोटीच्या अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दिली आहे.

तसेच या निर्णयानुसार कोपरगाव तालुक्यातील एकूण 41,535 शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. 2023 च्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ नुकतंच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. कोपरगाव मतदार संघातील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिक घेतले होते. यामध्ये 35942 वैयक्तिक आणि 5593 सामाईक शेतकऱ्यांचा समावेश असून 38205 सोयाबीन उत्पादक शेतकरी व 3330 कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. सोयाबीन व कपाशी पिकासाठी हेक्टरी 5000 व जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

सध्या खरीप पिकांच्या काढणीचा तर काही ठिकाणी रब्बीची तयारी करण्यात शेतकरी गुंतला आहे. यावर्षी पाऊस देखील प्रमाणापेक्षा जास्त नसला तरी समाधानकारक आहे. त्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या काढणी खर्चाला व रब्बी पिकांच्या पूर्व तयारीला या अनुदानाच्या रक्कमेतून शेतकऱ्यांना काही अंशी हातभार लागणार आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे आभार मानले.

क्रिकेटविश्वात खळबळ! एकाच तासांत दोन कर्णधारांचे राजीनामे; नेमकं काय घडलं?

सोयाबीन व कापूस अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी ई केवायसी (E KYC) प्रक्रिया बंधनकारक आहे. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनी तातडीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

follow us