Download App

निवडणुकीआधीच धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी; भर सभेत तटकरेंनी बोलून दाखवलं

धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित नसून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.

Sunil Tatkare : धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित नसून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी बोलून दाखवलंय. दरम्यान, बीडमधील परळीत आयोजित जनसन्मान यात्रेत ते बोलत होते.

ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक! सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार; ज्येष्ठ नेत्याचा दावा..

पुढे बोलताना तटकरे म्हणाले, धनंजय मुंडे तुमचं अभिनंदन करतो कारण असंख्य महिला या मेळाव्यासाठी आल्या आहेत. धनंजय मुंडे तुम्ही फक्त परळीपुरतेच मर्यादित नाहीत, फक्त बीडपुरतेच नाहीत. संताच्या भूमीचे मुंडे नेते आहेतच पण उभा महाराष्ट्राचे कर्तृत्वाने म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. अजितदादांनी 2014 साली तुमच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवली. गोपीनाथ मुंडेंनतर विरोधी पक्षनेता कसा असतो याचं उदाहरण उभ्या महाराष्ट्राने धनंजय मुंडेंच्या रुपात पाहिलं असल्याचे गोडवे तटकरे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत गायले आहेत.

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने सामना जिंकला; आता आव्हान न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचं

तसेच काळाच्या ओघात राजकीय समीकरणे बदलतात. आता तुमच्यावर एक चांगली जबाबदारी सोपवलीयं. तुम्ही शेतकरी कृषी खात्याची जबाबदारी तुम्ही चांगली पार पाडत आहात. लाडकी बहीण योजना दादांनी दिली. या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी महिला नीटनेटका संसार उभा करतील. मुंडेंना एकच सांगतोयं तुमच्यावर फक्त सहा जागांची जबाबदारी नाही तर तुम्हाला कोकणात, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मुंबईसारख्या शहरात प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय.

तसेच परळीकरांनी परवानगी दिली तर ते संपूर्ण महाराष्ट्र असा ढवळून काढतील की महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल. आणि राष्ट्रवादीचं अढळ स्थान दादांच्या नेतृत्वात आम्ही निर्माण करु. 2014 पासून मुंडेंनी वेगवेगळी जबाबदारी स्विकारलीयं. दादांची माफी मागून सांगतोयं, 2024 नंतर तुम्हाला मोठी जबाबदारी घ्यायची आहे. तुमच्या नेतृत्वाचा योग्य उपयोग राष्ट्रवादी करेल. तुमच्यासारखा प्रभावशाली नेता कसा ठसा उमटू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे असणार असल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलंय.

follow us