ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक! सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार; ज्येष्ठ नेत्याचा दावा..

ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक! सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार; ज्येष्ठ नेत्याचा दावा..

Prithviraj Chavan on Chief Minister Post : राज्यात निवडणुका जवळ आलेल्या असताना राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या घडामोडींत राज्याच्या मुख्यमंत्रिदाचा चेहरा कोण असेल हा प्रश्न जरा जास्तच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा असेल असे वक्तव्य केले होते. मात्र काँग्रेस आणि शरद पवार गट (Sharad Pawar) या मुद्द्यावर उदासीन आहेत. शरद पवार यांनी अनेकदा ही मागणी फेटाळून लावली होती.

त्यानंतर आता काँग्रेसचे (Congress Party) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचेही सूर बदलले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूलाच सांगितला म्हणाले, “ज्यांचं संख्याबळ..”

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ?

राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. राज्यातलं हे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार असेल आणि काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल. कारण, लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिला तर सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे. लोकसभा निवडणुकीत 65 टक्के जागांवर काँग्रेसला आघाडी मिळालेली आहे. याचा अर्थ विधानसभेतील 288 पैकी 183 हून जास्त जागा आपल्याला मिळतील असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका सभेत केले.

शरद पवारांनाही ठाकरेंची मागणी अमान्य

दरम्यान, महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी सातत्याने होतेय. काँग्रेस नेते मात्र या मागणीला अनुकूल नाहीत. मग राष्ट्रवादी काँग्रेसची याबाबत काय भूमिका आहे असे विचारले जात होते. त्यावर शरद पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, आमच्यात कुणालाच इंटरेस्ट नाही. कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला फक्त सत्ता परिवर्तनाचं ध्येय. राज्यातील सत्तेत बदल घडवून लोकांना पर्याय कसा देता येईल यावर लक्ष केंद्रीत करू या. या मुद्द्याची (मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार) आता काहीच गरज नाही. मी ही मुख्यमंत्री होण्याचा तर प्रश्नच नाही.

पुण्यात भाजपाला मोठा धक्का! भाजप प्रदेश पदाधिकारी सचिन फोलानेंचा शरद पवार गटात प्रवेश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube