Video : महाराष्ट्र पोलिसांचे बूट बदलणार; अक्षय कुमार करणार डिझाईन?, फडणवीसांची विनंती

अक्षयनं महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांबाबत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधत त्यांचे बूट बदलण्याची मागणी फडणवीसांकडे केली.

Video : महाराष्ट्र पोलिसांचे बूट बदलणार; अक्षय कुमार करणार डिझाईन?, फडणवीसांची विनंती

Video : महाराष्ट्र पोलिसांचे बूट बदलणार; अक्षय कुमार करणार डिझाईन?, फडणवीसांची विनंती

Bollywood Actor Akshay Kumar Demand CM Fadnavis To Change Maharashtra Police Shoo : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांचे डिझाईन करणार आहे, खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षयला याचे डिझाईन करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे येत्या काळात अक्षयने डिझाईन केलेले बूट घालून महाराष्ट्र पोलिस दिसून येऊ शकतात. फिक्की फ्रेम्सच्या कार्यक्रमात अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी अक्षयनं महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांबाबत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर लक्ष वेधत त्यांचे बूट बदलण्याची मागणी फडणवीसांकडे केली. त्यावर फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद देत अक्षयलाच पोलिसांचे बुट डिझाईन करण्याची विनंती केली आहे.

पोलिसांच्या बुटांना हिल्य त्यामुळे…

पोलिसांचे बूट बदलण्याचा मुद्दा अधोरेखित करताना अक्षयने फडणवीसांना सांगितले की, सध्या महाराष्ट्र पोलीस वापरत असलेल्या बुटांमुळे त्यांना  धावताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारण, या बुटांना टाचा म्हणजेच हिल्स आहेत. यामुळे धावणे कठीण होतं. यामुळे त्यांच्या पाठीला काहीना काही अडचणीदेखील उद्भवता. या सर्व गोष्टींचा विचार करता जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर, त्यांचे बूट बदलले, तर त्याचा पोलिसांना उपयोग होईल. ते अधिक धावू शकतील, असे अक्षय कुमारने म्हटले.

थेट अक्षयलाच बुटांच्या डिझाईनची ऑफर

मुलाखतील अक्षयने अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याने फडणवीसांनीदेखील त्याचे कौतुक केले. आतापर्यंत कुणीही लक्षात न आणून दिलेला महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडल्याचे सांगत या मागणीला तात्काळ सहमतीदेखील दाखवली. एवढेच नव्हे तर, अक्षय कुमारला थेट बूट डिझाईन करण्याची विनंती केली. तुम्ही काही डिझाईन किंवा इनोव्हेशन सांगितलं, तर आपण ते प्रत्यक्षात अंमलात आणू. तुम्ही अॅक्शन हिरो आहात. त्यामुळे तुम्हाला बूट कोणता वापरला पाहिजे हे माहीत आहे. तुम्ही सूचवा. आपण करू,” असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी अक्षयला दिले.

Exit mobile version