Download App

Assembly Session : जुगार अड्ड्यावर बसला आहात का? सभागृहातच बच्चू कडूंचा आदित्य ठाकरेंवर प्रहार

Assembly Session : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांचा प्रस्ताव मांडण्याचा शेवटचा आठवडा आहे. आत्तापर्यंत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक आरोप-प्रत्योराप होताना दिसून आले आहेत. अशातच आता प्रहार संघटनेचे बच्चू कडूही(Bacchu Kadu) आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. बच्चू कडू सभागृहात बोलताना आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे आमदार गप्पा मारत होते, या आमदारांना तुम्ही जुगार अड्ड्यावर बसले का? असा खोचक सवाल करीत विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्याचं पाहायला मिळालयं.

Devendra Fadanvis : आळंदीतील लाठीचार्जचे व्हिडीओ एडीट केलेले; फडणवीसांचे पलटवार करत गंभीर आरोप

बच्चू कडू म्हणाले, अध्यक्ष महोदय, मी बोलत असतांना काही लोक गप्पा मारत आहेत. हे सभागृहात बसले आहेत की सभागृहाच्या बाहेर? जुगार अड्ड्यावर बसले आहेत की काय? आदित्य ठाकरे, जाधव साहेब, वायकर हे आपसात बोलत आहेत. अध्यक्ष महोदय, यांना सभागृहाचे नियम सांगा. तुमचा प्रभाव पडत नसल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.

China : बिजींगमध्ये पावसाचा कहर; 20 जणांचा मृत्यू; मेट्रो-रेल्वे बंद, विमानांची 400 उड्डाणं रद्द

तसेच विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव असून खरेतर विरोधी पक्षच राहणार नाही असे दिसतेय. कदाचित ती जबाबदारी आमच्यावरही येऊ शकते, असा टोला सुरुवातीला कडू यांनी लगावला. राज्यातल्या ग्रामीण भागातील विजेच्या मुद्द्यावरुन कडू यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. ‘तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागातले आहोत. २४ तासांचे वीज बिल घेतात, ८ तासच वीज देतात.

विजेच्या मुद्द्यावरुन राज्यात जे चाललंय, ते थांबवायला हवे. विजेच्या वायर घराच्या हातभर उंचावरून जातात. जेवढे धर्माच्या नावाने मेले नाहीत तेवढे या व्यवस्थेने मारले आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. चार-पाच लाखाची मदत, गरीबाचा मृत्यू एवढा स्वस्त केलाय. आमदार खासदाराचं पोरगं मरत नाही ना म्हणून तिकडे लक्ष दिले जात नाहीय’, अशी टीका कडू यांनी केली.

Tags

follow us