Mohan Bhagwat : भारताला कमजोर व विभाजित करण्याचे प्रयत्न ; मोहन भागवतांचा मोठा दावा

Mohan Bhagwat : आज भारताला कमजोर करण्याचे आणि विभाजित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

Mohan Bhagwat : आज भारताला कमजोर करण्याचे आणि विभाजित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत दसरा मेळाव्यात बोलताना केला आहे. सत्ता परिवर्तनासाठी केली जाणारी आंदोलने मूलभूत समस्यांचे निराकरण करत नाहीत उलट, ती राजकीय स्वार्थाची साधने बनू शकतात आणि समाजात फूट पाडण्याचे काम करू शकतात असं मोहन भागवत म्हणाले.

मेळाव्यात बोलताना मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले की, स्वतःचे अजेंडा राबवू पाहणाऱ्या शक्ती अनेकदा राजकीय परिस्थिती बदलण्यासाठी सत्ता परिवर्तनाचा मार्ग निवडतात, परंतु अशा प्रयत्नांतून क्वचितच अपेक्षित परिणाम मिळतात. ते असा दावा करतात की सत्ता बदलल्यास परिस्थिती बदलेल, परंतु प्रत्यक्षात तसे कधीही घडलेले नाही. एक शक्तिशाली भारत अशा शक्तींच्या मार्गात अडथळा ठरेल, म्हणूनच देशाला कमकुवत करण्याचे आणि विभाजित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काही जागतिक शक्ती कदाचित भारताचा विकास इच्छित असतील, परंतु त्यांना भारत खूप शक्तिशाली व्हावा असे वाटत नाही, कारण तसे झाल्यास त्यांच्या स्वतःच्या वर्चस्वाला आव्हान निर्माण होऊ शकते असं यावेळी मोहन भागवत म्हणाले.

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आंदोलनांचा उद्देश समस्या सोडवणे हा असावा, सामाजिक दरी वाढवणे हा नव्हे. समस्या कायम राहतील आणि लोकशाहीत आंदोलने होणे ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु, या आंदोलनांचा उद्देश काय असावा? त्यांचा एकमेव उद्देश समस्यांवर उपाय शोधणे हाच असायला हवा. जेव्हा आंदोलने जनहित सोडून इतर हेतूंनी प्रेरित असतात, तेव्हा ती राजकीय शस्त्रे बनतात आणि विशिष्ट व्यक्ती, गट किंवा विचारसरणींविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम करतात.

भागवत यांनी राजकीय नेते, आंदोलक आणि प्रशासनाला आवाहन केले की, त्यांनी अशा प्रकारे वागू नये ज्यामुळे समाजात कटुता किंवा फूट निर्माण होईल. ते म्हणाले, “आपल्या भावना कितीही तीव्र असल्या, तरी आपण नेहमी आपल्या राज्यघटनेने घालून दिलेल्या मर्यादा, सुसंस्कृत संवादाचे नियम आणि सभ्य वर्तनाचे निकष पाळले पाहिजेत.”

ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या कंटेंट (Content) नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, आजची तरुण पिढी कोणताही विचार न करता असा आशय पाहत आहे. भागवत म्हणाले, विचारांची पेरणी करा, कृतीची फळे मिळतील. चारित्र्याची पेरणी करा, नशीब घडवाल. जेव्हापासून आपण आपली भावनिक एकता विसरलो आहोत, तेव्हापासून आपण अधिक कमकुवत झालो आहोत.

Exit mobile version