Download App

Video: भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाच्या नावावर गाडी; ऑडी अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल

नागपूरमध्ये मोठा अपघात, घटनेतील गाडी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाची असल्याचं उघड झाल्यावर त्यांनीही प्रतिक्रिया दिली.

  • Written By: Last Updated:

Hit and run in Nagpur :  नागपूरमध्ये एका ऑडी कारने काल मध्यरात्री शहरात पाच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. यामधअये दोघं जखमी झाले तर वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागपूरच्या रामदासपेठ परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या नावाने आहे.

काँग्रेसकडून व्हिडिओ पोस्ट

पोलिसांच्या माहितीनुसार, संकेत यांची मोटार त्यांचा चालक अर्जुन हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) यांना चालवायला दिली होती. याच कारने पाच वाहनांना धडक दिली. अपघातग्रस्त जितेंद्र सोनटक्के (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली. पोलिसांनी मोटार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. त्यावेळी तिची ‘नंबर प्लेट’ काढण्यात आल्याचं उघड झालं. कार कुणाच्या नावावर आहे, याची माहिती वाहतूक कार्यालयाकडून मागविल्याचं पोलीस अधिकारी चंद्रशेखर चकाटे यांनी सांगितलं आहे. दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर या अपघाताचा व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्राच्या गृह खात्याला अनेक प्रश्न विचारले आहेत.

काय म्हणाले बावनकुळे?

माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी आपल्या एक्स (ट्वीटर)वरून दिली आहे.


follow us

संबंधित बातम्या