सेबीची अवधूत साठेवर कठोर कारवाई; 546 कोटी परत करण्याचे आदेश!

Avadhut Sathe Trading Academy SEBI Action: अवधूत साठेंवर सेबीने कारवाई करत 546.17 कोटी रुपये 67.87 कोटींच्या व्याजासह परत करण्याचे आदेश दिले.

Avadhut Sathe Trading Academy SEBI Action

Avadhut Sathe Trading Academy SEBI Action

Avadhut Sathe Trading Academy SEBI Action: शेअर बाजाराचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली नोंदणीशिवाय गुंतवणूक सल्ला आणि संशोधन विश्लेषण सेवा दिल्याच्या प्रकरणात भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने (SEBI) अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संस्थापक अवधूत साठे यांच्याविरोधात कठोर कारवाई केली आहे. अकॅडमीने प्रशिक्षणार्थींकडून गोळा केलेले 546.17 कोटी रुपये आणि त्यावरील 67.87 कोटी रुपयांचे व्याज परत करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! 500 कोटींच्या चर्चेत नवा ट्विस्ट! उदय सामंतांच्या विधानाने खळबळ

या प्रकरणात गंभीर आर्थिक गैरव्यवहारासाठी सेबीने अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीवर 11.5 कोटी रुपयांचा एकूण दंड ठोठावला. तसेच अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीच्या भांडवली बाजारातील व्यवहारांवर दोन वर्षांसाठी किंवा संपूर्ण परतावा होईपर्यंत, यापैकी जो कालावधी अधिक असेल तोपर्यंत भांडवली बाजारात प्रवेश करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

कोणाला किती दंड?

उपलब्ध माहितीनुसार, सेबीने अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडला 6 कोटी रुपये, संस्थापक अवधूत साठे यांना 4 कोटी रुपये आणि गौरी अवधूत साठे यांना 1.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गौरी अवधूत साठे यांना सहा महिने भांडवली बाजारापासून दूर राहण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे नमूद आहे.

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच; दुष्काळाचं मोठ संकट, सप्टेंबरमध्ये धक्कादायक आकडा

सेबीने कारवाई का केली?

सेबीच्या तपासात अकॅडमीने पेड कोर्सेस, वर्कशॉप्स आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर खरेदी-विक्रीसंबंधी सल्ला दिल्याचे तपासात उघड झाले आहे. अशा प्रकारच्या गुंतवणूक सल्ला आणि संशोधन विश्लेषण सेवा देण्यासाठी आवश्यक सेबीकडे नोंदणी नसल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे.

देवेंद्रजींना संपवण्यासाठी जरांगेंना कोण ताकद देत होतं, बोलायचं का? – दरेकरांचा शिवसेना नेत्यांवर निशाणा

तसेच शिक्षणाच्या नावाखाली गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे खोटे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर निधी गोळा करण्यात आला होता. अनोंदणीकृत क्लासेस आणि दिशाभूल करणाऱ्या सेवा देणाऱ्यांविरुद्ध सेबीने उचललेले हे आजवरच्या सर्वात कठोर पावलांपैकी एक मानले जात आहे.

Exit mobile version