Download App

Bacchu Kadu : बच्चू कडुंना मोठा दिलासा; ‘त्या’ आंदोलनाची सुनावणी एप्रिलमध्ये होणार

  • Written By: Last Updated:

Bacchu Kadu : मंत्रालयातील आंदोलनप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना मोठा दिलास मिळाला आहे. मंत्रालयातील आंदोलन प्रकरणातील सुनावणी 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. न्यायालयातील कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने सत्र न्यायालयातील या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. सुनावणी पुढे ढकलली गेल्याने बच्चू कडू यांना या प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे.

Old Pension Scheme : जुन्या पेन्शनवर तोडगा नाहीच, कर्मचारी संपावर ठाम

बच्चू कडुंनी 26 सप्टेंबर 2018 रोजी एका सरकारी पोर्टलला विरोध करत आंदोलन केले होते. एवढेच नव्हे तर, कडू यांनी मंत्रालयातील तत्कालीन संचालक असलेल्या जैन यांच्यासोबत शाब्दीक वाद झाले होते. तसेच यावेळी कडू यांनी जैन यांना मारहाण केल्याचे आरोर बच्चू कडू यांच्यावर असून, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. यानंतर या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, आता, कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने या प्रकरणावरील सुनावणी 3 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Oscar 2023 : भारताला दोन ऑस्कर पण ऑस्कर पुरस्कारांचा इतिहास काय आहे? पुरस्कारांची निवड कशी होते?

दिव्यांगांच्या आंदोलनाप्रकरणी 2 वर्षाची शिक्षा

कडू यांनी 2017 मध्ये दिव्यांग्यांच्या मागण्यांसाठी नाशिक महापालिकेत आंदोलन केले होते. याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालाने बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या आंदोलनावेळी कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक वर्ष, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक वर्ष अशी 2 वर्षांची शिक्षा बच्चू कडू यांना ठोठावण्यात आली आहे. दिव्यांगांसाठीचा तीन टक्के राखवी निधी खर्च केला जात नसल्याची बच्चू कडू यांची तक्रार होती. तसेच 1995चा अपंग पुनर्वसन कायदा सरकारने अंमलात आणला नसल्याचा आरोप कडू यांनी करत हे आंदोलन केले होते.

दरम्यान,  2018 मध्ये मंत्रालयातील आंदोलनप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. परंतु, या प्रकणावरील पुढील कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने आता यावरील सुनावणी 3 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय कडू यांच्यासाठी एकप्रकारचा मोठा दिलास असल्याचे मानले जात असून, पुढील सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us