Download App

बागेश्वर बाबाचं वक्तव्य आम्ही.., अजित पवारांनी घेतला समाचार

पुणे : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) कोण हे मला माहित नाही, पण बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळीरांविरोधात कायदा केला पाहिजे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केलीय. तसेच काही लोकांकडून महागाई, बेरोजगारी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.

पवार म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांवर अवमाजनक वक्तव्य केल्याचे प्रकार घडलेत. महापुरुषांबद्दल काही भाजपच्या नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरण्यात आली त्यावर कोणीही काहीच कारवाई केलेली नाही.बेताल वक्तव्य करणारे वाचाळवीर कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्याच काम सुरु असल्याचा आरपही त्यांनी केलाय. तसेच जाणून-बुजून इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी असे प्रकार सुरु असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

काय म्हणाले बागेश्वर बाबा?
संत तुकाराम महाराष्ट्राचे एक असे महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती. कुणीतरी त्यांना विचारले की तुम्ही पत्नीकडून मार खातात, तुम्हाला लाज वाटत नाही का? यावर संत तुकाराम म्हणाले की देवाची कृपा आहे की, मला मारणारी पत्नी मिळाली. यावर त्या व्यक्तीने विचारले की यामध्ये देवाची कृपा काय? तर संत तुकाराम म्हणाले, जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवावर प्रेम केले नसते, पत्नीच्याच नादात अडकलो असतो. मारणारी पत्नी मिळाली तर ती संधी तरी देतेय की, माझ्या नादात कुठे अडकलास जा प्रभू रामाच्या चरणी जा, असे बागेश्वर बाबा म्हणत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राज्यात सध्या काहीही घडतंय कोणी कोणावर शाई फेकतंय तर कोणी कोणाला काळे झेंडे दाखवत आहेत, हे सर्व कुठंतरी थांबलं पाहिजे. यासंदर्भात लोकांवर जरब बसण्यासाठी कायदा केला पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केलीय.

दरम्यान, बागेश्वर बाबांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं असून ते आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त त्यांनी केलाय. तसेच त्यांच्यावर राज्य सरकारकडून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केलीय.

Tags

follow us