Download App

VIDEO : ‘दोन्ही भावांनी आपापसांत भांडून…’ ठाकरेंच्या युतीवर खासदार बंडू जाधव काय म्हणाले?

Bandu Jadhav on Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion : अखेर मुंबईमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी (Bandu Jadhav) लेट्सअप मराठीसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, सरकारने सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे. वेळापूर पासून दहा -वीस तरी निवारे असावे, अशी विनंती खासदार बंडू जाधव यांनी केली आहे. गडकरी साहेबांना विनंती की, मधोमध जी झाडं लावली आहेत. त्याखाली व्यवस्थित साफ-सफाई केली तर चांगली व्यवस्था होवू शकते.

ठाकरे हे ब्रॅंड

देर आये, दुरूस्त आए. त्यांनी एकत्र यावी, ही लोकांची ईच्छा आहे. माझ्याही मनात होतं. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने हे मिळवलं होतं, परंतु या दोन्ही भावांनी आपापसांत भांडून गमावण्याची वेळ आली होती. परंतु ही सुद्धा सावरण्याची वेळ आहे. ठाकरे हे ब्रॅंड पुढेही चांगलं राहू शकतं, असं खासदार बंडू जाधव यांनी म्हटलंय.

दुकांनाचे शटर बंद व्हायची वेळ आलीय म्हणून हे पुन्हा एकत्र येताहेत; प्रताप सरनाईकांचे पत्रातून सणसणीत उत्तर

यंत्रणेला मॅनेज झालात

तर एकनाथ शिंदे काही ठाकरे नाही. यंत्रणेला मॅनेज झालात, तुम्ही कर्तबगार आहे हे सगळ्या देशाने पाहिलंय. महाराष्ट्र सोडून कामाख्या देवीला गेले, सगळ्यांनी पाहिलंय. ठाकरेंच्या कुटुंबाला सोडून ठाकरेंच्या विचार घेवून पुढे जाता येणार नाही, असा टोला बंडू जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. खरं तर खासदार बंडू जाधव हे वारीमध्ये सहभागी झाले होते.

नितीन गडकरींनी कौतुक केलेले… IPS नुरुल हसन कोण आहेत? घ्या जाणून…

कोणालाही निमंत्रण नसताना…

सलग अठ्ठावीसावी वारी बंडू जाधव करीत आहेत. जगाच्या पाठीवर असा अद्भुत सोहळा कुठेच नाही. कोणालाही निमंत्रण नसताना, जिथे मिळेल तसा आनंद वारकरी घेतात, असं देखील त्यांनी म्हटलंय. असा सुखी सोहळा कुठेच नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना त्यांनी दिली आहे. 1997 पासून मी वारी करीत आहेत. बळीराजा सुखी होवू दे, असं साकडं बंडू जाधव यांनी विठुरायाच्या चरणी घातलं आहे.

 

follow us