दादांशिवाय कुठलीच गोष्ट… मतदानानंतर दादांच्या आठवणींनी सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Baramati By Election सुनेत्रा पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

Baramati By Election

Baramati By Election

Baramati By Election Sunetra Pawar Emotional after Voting in Ajit Pawars Memories : राज्यामध्ये आज राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाला सुरूवात झाली. यावेळी पवार स्वत: उपमुख्यमंत्री आणि उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत काटेवाडी या त्यांच्या गावी मतदान केलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

मतदान केल्यानंतर सुनेत्रा पवार भावूक…

मतदार संघातील सर्वच ठिकाणी जरी हा मतदानाचा उत्साह म्हणता आला नाही, तरीही मतदार आपलं कर्तव्य म्हणून मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. तसेच बारामतीतील जनता ही दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून सर्वच गावातून मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. ही पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणामध्ये होत आहे.

आज राहुरी अन् बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान! सुनेत्रा पवार अजितदादांच्या स्मृतीस्थळी तर कर्डिलेंनी केलं मतदान

तसेच बारामतीकरांनीच ही निवडणूक हाती घेतलेली आहे. त्यामुळे ते सर्वजण या निवडणुकीकडे कर्तव्य म्हणून पाहत आहेत. तसेच यावेळी बोलताना प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले आणि सर्वच बाजूने ही निवडणूक भावनिक असल्याचा त्यांनी म्हटलं. अजित पवारांच्या आईचं वय 89 असल्याने त्यांचं घरीच मतदान पार पाडल्याचे देखील यावेळी सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. तसेच दादांशिवाय कुठलीच गोष्ट करण्याची सवय नाही. मात्र आज हे मान्य करावे लागेल की दादा आपल्यात नाहीत.

इथेनॉल आधारित अर्थव्यवस्थेकडे भारताची झेप, नितीन गडकरी यांचे संकेत, भारत 100% इंधन ब्लेंडिंगकडे?

दरम्यान राज्यामध्ये आज 23 एप्रिल 2026 रोजी राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच य अगोदर 6 एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर 7 एप्रिलला अर्जाची छाननी झाली. तर 9 एप्रिल रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर हा दोनही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं.

Exit mobile version