Download App

Uday Samant : शेतकऱ्यांना रेटून प्रकल्प पुढे नेणार नाही; सामंतांचे आश्वासन

Barasu Refinery :  राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथे रिफायनरीच्या मुद्द्यावरुन अनेक लोक आंदोलन करत आहेत. या सगळ्या विषयावर उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली. प्रशासनांना चार पावलं पुढे जाऊन निर्णय घेतला आहे, असे सामंत म्हणाले आहेत.

Mscb च्या अधिकाऱ्याची हेडकॉटरला बदली करण्यात आली आहे. या प्रकल्पासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा करणार आहोत. शरद पवारांप्रमाणे इतर काही पक्षातील नेत्यांचा  गैरसमज दूर केला जाईल. याबाबत 2 ते 3 तारखेला मुंबईत बैठक होणार आहे, असे ते म्हणाले आहेत.

मुंबई मेट्रोत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसह विद्यार्थ्यांना 25 टक्के सवलत

यामधून शेतकऱ्यांना कुठेही त्रास देण्याचा प्रयत्न नाही. माती परीक्षण झाल्यानंतरच हा प्रकल्प निश्चित होईल.
हा प्रकल्प रेटून पुढे जाणार नाही. बेरोजगारी दूर करणारा हा प्रकल्प आहे. आंदोलकनाच्या कार्यकर्त्यांसोबत संयमाने चर्चा होणार. ग्रामस्थांसोबत सुद्धा बोलणार, असे सामंत म्हणाले आहेत. तसेच यासाठी बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही, कोकणातल्या लोकांनी कोकणातले निर्णय घ्यावे, असे सामंत म्हणाले आहेत.

रिफायनरीसाठी लोकांचे टाळके फोडणे योग्य नाही… पटोलेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

तसेच काही लोक पत्रकार परिषद घेऊन बारसू येथील लोकांना पेटवायचं काम करत आहेत पण ते  योग्य नाही. आम्ही गावागावात लोकांना प्रांत ऑफिस मध्ये बोलावून प्रकल्पाची माहिती देणार आहोत, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

 

Tags

follow us