Download App

काळजी घ्या…नव्या व्हायरसवर उपचार नाही; खबरदारी हाच उत्तम पर्याय!

मुंबई : गेली दोन वर्षे कोरोनाने जगभर कहर केला होता. या व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस तयार करण्यात आली. यामुळे कोरोना काही अंशी आटोक्यात आला. मात्र आता पुन्हा एक नवं संकट देशावर आले आहे. H3N2 नावाचा व्हायरसची देशात एंट्री झाली आहे. या व्हायरसने आतापर्यंत महाराष्ट्रात दोघांचे बळी घेतले आहे. चिंतेची बाब म्हणजे या व्हायरसवर सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. यामुळे आपण स्वतःहून काळजी घेणे गरजेची असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातही H3N2 या व्हायरसचे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. राज्यातील मेट्रो सिटीमध्ये म्हणजेच प्रामुख्याने मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर येथे H3N2 या व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहे. या रुग्णांची वाढ पाहता आरोग्य यंत्रणा देखील सर्तक झाल्या आहेत. यातच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. H3N2 वर औषधं उपलब्ध नसल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आरोग्यमंत्री? जाणून घ्या
राज्यात H3N2 इनफ्लूएंझाचा फैलाव होऊ लागला आहे, मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे, मास्कचा वापर करा आणि सुरक्षित अंतर राखा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. महाराष्ट्रात H3N2 सह कोविडच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी

दरम्यान राज्यात कोरोनाचा देखील प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातच आता या नव्या H3N2 या व्हायरसची भर पडली आहे. यामुळे आरोग्य प्रशासन अलर्ट झाले आहे. या सर्व प्रकरणांवर सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी आरोग्य विभागाची बैठक पार पडली.

Corona Update : जगाचं टेन्शन पुन्हा वाढलं; इस्रायलमध्ये आढळले नव्या व्हेरिएंटचे दोन रूग्ण

H3N2 पासून असा बचाव करा
H3N2 इनफ्लूएंझा या आजारावर औषधं उपलब्ध नाही. मात्र वेळीच फ्लूवरील उपचार घेतल्यास हा संसर्ग बरा होऊ शकतो. सध्या हवामानात मोठा बदल होत असल्याने चिंतेमध्ये भर पडत आहे. यामुळे याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. व्हायरसपासून बचावासाठी मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, स्वच्छ हात धुवावे, योग्य सामाजिक अंतर ठेवावे अशा संरक्षणात्मक सूचनांचे पालन करावे असे आवाहन मंत्री सावंत यांनी केलं आहे.

Tags

follow us