ज्योतिबा मंदिरात गोंधळ; 15-20 पुजाऱ्यांनी भाविकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

मंदिराच्या परिसरातच 15 ते 20 पुजाऱ्यांनी दोन भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असून हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Untitled Design 79

Untitled Design 79

Beaten in the darshan queue : कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या परिसरातच 15 ते 20 पुजाऱ्यांनी दोन भाविकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दर्शनाच्या रांगेत वर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोखंडी पायऱ्यांजवळ ही मारहाण झाल्याचे दिसून येत आहे. दोन भाविकांवर पुजाऱ्यांचे दोन गट अक्षरशः तुटून पडल्याचे दृश्य यात स्पष्ट दिसत आहे.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हे दोन्ही भाविक जमिनीवर कोसळतात. त्यानंतर जमिनीवर पडलेल्या भाविकांच्या पोटावर आणि शरीरावर पुजारी लाथा मारताना दिसत आहेत. काही पुजारी भाविकांना भिंतीजवळ अडवून मारहाण करत असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे माही पुजाऱ्यांनी भाविकांच्या ओक्यात नारळ मारल्याचं देखील व्हिडिओत दिसत आहे. सुरूवातीला उपस्थित भाविकांनी ही मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आणि बूटांना मुजरा करत हर्षवर्धन सदगीरने घेतली निवृत्ती

मात्र त्यावेळी त्यांना देखील काही पुजाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अखेर इतर भाविकांनी हस्तक्षेप केल्यानंतर ही मारहाण थांबवण्यात आली. या वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मंदिर परिसरातच घडलेल्या या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. देवाची सेवा करणारे पुजारीच भाविकांवर हल्ला करत असल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान या प्रकरणात मंदिर प्रशासन आणि पोलीस नेमकी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Exit mobile version