Download App

भगवान गडाचे चौथे मठाधिपती ठरले; महंत नामदेव शास्त्रींकडून घोषणा…

भगवान गडाचे चौथे मठाधिपती ठरले असून महंत कृष्णा महाराज शास्त्री यांच्या नावाची घोषणा महंत नामदेव शास्त्री यांनी केलीयं.

Bhagwan Garth : भगवान गडाचे (Bhagwan Garth) चौथे मठाधिपती ठरले असून गडाचे महंत नामदेश शास्त्री यांनी चौथ्या मठाधिपतीची घोषणा केलीयं. महंत कृष्णा महाराज शास्त्री यांच्या नावाची घोषणा नामदेव शास्त्री यांनी केलीयं. नामदेव शास्त्री यांनी महंत कृष्णा महाराज यांना आपले उत्तराधिकारी म्हणून जाहीर केलंयं. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात भगवाड गड असून या गडाचे मठाधिपती म्हणून महंत कृष्णा महाराज असणार आहेत.

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपये कामाचा भव्य शुभारंभ

भगवान गड हा स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच राज्यात चर्चेत आहे. गोपीनाथ मुंडे हे दसरा मेळावा याच गडावर घेत असत. मुंडेंच्या दसरा मेळाव्यानिमित्त भगवानगड हा अधिक चर्चेत आला होता. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना या ठिकाणी दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला. त्यामुळे नामदेव शास्त्री यांच्यासह भगवानगड हा चांगलाच चर्चेत आला.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
गडाच्या दसऱ्या मेळाव्याला 73 वर्ष पुर्ण होत आहेत. ही परंपरा मुंडे साहेबांनी सुरु केलेली नाही. गेल्या 10 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये झालेल्या वादानंतर भगवान गडावर होणारा दसरा मेळावा हा मी बंद केला. त्यांच्या वादामुळे भगवान गडावरचा मेळावा बंद झालेला नाही. मलाच राजकीय भाषण नको होतं. पंकजा आणि धनंजय या दोघांचा संघर्ष हा त्याचा वैयक्तिक विषय आहे. भगवान बाबाच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणून मी हा मेळावा बंद केला असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं.

follow us

संबंधित बातम्या