Download App

काळ्या कपड्यातला मांत्रिक अन्… अघोरी पूजा करताना मंत्री भरत गोगावले? नवीन व्हिडिओ चर्चेत

Bharat Gogawale Puja With Black Magician New Video Viral : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन विषय ट्रेंडिंगला आहे. तो म्हणजे भरत गोगावले अन् अघोरी पूजा. यावर गोगावलेंनी (Bharat Gogawale) स्पष्टीकरण सुद्धा दिलंय. त्यांनी म्हटलं की पूजा ही अघोरी असूच शकत नाही. परंतु या स्पष्टीकरणाला 48 तास उलटले नाही, तर भरत गोगावलेंचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ (Bharat Gogawale Puja With Black Magic) समोर आलाय. यामध्ये ते एका मांत्रिकासोबत पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी (Suraj Chavan Tweet) त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट केला आहे.

अघोरी पूजा?

तीन चार दिवसांपू्र्वी मंत्री भरत गोगावले यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये भरत गोगावले पूजा करताना दिसत होते. त्या व्हिडिओवर ठाकरे गटाचे वसंत मोरे यांनी म्हटलं होतं की, नेहमी दिसणाऱ्या पूजेपेक्षा ही पूजा वेगळी (Maharashtra Politics) आहे. परंतु गोगावले यांनी म्हटलं की, पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असून पूजा अघोरी असूच शकत नाही. परंतु आता त्यांचा पूजेचा नवा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

व्हिडिओमध्ये काय?

या व्हिडिओमध्ये भरत गोगावले एका सोफ्यावर बसलेले आहेत. त्यांच्या बाजूला भगवे कपडे परिधान केलेले काही मांत्रिक असून काळे कपडे परिधान केलेला अजून एक मांत्रिक आहे. तो गोगावलेंच्या हातात एक वस्तू त्यांच्या कपाळावर लावून देत आहे. नेहमी होणार्‍या पूजेपेक्षा ही पूजा वेगळी दिसत आहे.

गोगावलेंच्या व्हिडीओवर राष्ट्रवादीची तिखट प्रतिक्रिया

पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रकार दुर्दैवी आहे. गोगावलेंनी बोलताना अनेकदा पूजा अन् नवसाचा उल्लेख केलाय.
जर अशा पूजा करून मंत्रि‍पदे  मिळत असतील तर त्यांचा महायुतीच्या नेत्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्न देखील सूरज चव्हाण यांनी उपस्थित केलाय.  पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले अशी पूजा करत करीत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केलाय.

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सध्या महायुतीत वाद सुरू आहेत. त्यासाठीच भरत गोगावले अशी पूजा करीत आहेत, असा आरोप त्यांच्यावर महायुतीतीलच काही नेते करत आहेत.

 

follow us