Download App

Jalgaon Accident Video : जळगावजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना; अनेकांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

  • Written By: Last Updated:

Major Train Accident Near Jalgaon : जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार आगीच्या भीतीमुळे साधारण 35 ते 40 प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना उडवलं आहे. यात 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे तर, 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळील जिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

 

 

अपघात नेमका कसा झाला?

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावच्या परधाडे स्टेशनजवळून पुष्पक एक्सप्रेस जात असताना चालकाने ब्रेक मारला त्यावेळी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर आग लागल्याची अफवा पसरली असता अनेकांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना उडवलं यात सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याचं काही लोक सांगत आहेत. अजून या घटनेची माहिती यायची बाकी आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना मदत करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगावमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना, नेमकं काय घडलं?
पुष्पक एक्स्प्रेसने ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या पडल्या.  पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरवली. प्रवाशांनी उड्या मारल्या, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने अनेकांना उडवलं.  सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

पुष्पक एक्सप्रेसच्या एसी 3 कोचमध्ये आग लागल्याची अफवा पसरली, त्यामुळे चेन ओढण्यात आली. ट्रेन थांबताच ३५ ते ४० प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. बाजूच्या ट्रॅकवरून दुसरी ट्रेन जात होती. तिने या लोकांना उडवलं. सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याच समजयं, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. आम्ही जखमींना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयासह एकूण तीन रुग्णालयात दाखल करत आहोत, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, आता मंत्री गिरीश महाजन हे देखील घटनास्थळाकडे रवाना झाले.

follow us