Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप होतोय. सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर (Police custody) कराडला आज (22 जानेवारी) बीड जिल्हा विशेष न्यायालयाने (Beed District Special Court) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळं कराडच्या अडचणीत वाढ झाली.
सयाजी शिंदे 22 वर्षांनी पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, दोन अवलिया कलाकार येणार एकत्र
३१ डिसेंबर रोजी वाल्मिक कराडने पुणे सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं होतं. तेव्हापासून कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. सुरुवातीला त्याला खंडणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र नंतर संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यातही कराडला आरोपी करण्यात आलं. आता या प्रकरणी न्यायालयाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी जेव्हा सीआयडीला तपासासाठी कराडची गरज असेल तेव्हा ते कराडची चौकशी करू शकतात. यासाठी सीआयडीला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. गरज पडल्यास सीआयडी कराडच्या पोलिस कोठडीची विनंती करू शकते.
दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली तरी वाल्मिक कराडला पुढचे काही महिने तुरुंगात काढावे लागणार आहेत. कारण वाल्मिक कराडवर मकोका गुन्ह्याची नोंद झाली आहे. मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही. त्यामुळे कराड पुढील १८० दिवस म्हणजेच ६ महिने तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही अशी माहिती समोर येत आहे.
आकाचा मुलगाही गोत्यात येणार? सुरेश धसांचा ‘महादेव मुंडे’ खून प्रकरणाला हात…
कराड समर्थकांचा दबाव झुगारत कारवाई…
वाल्मिकी कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळी आणि बीड जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं होतं. टायर जाळणे, ठिय्या आंदोलन, परळी बंदची हाक यासंह जे जे शक्य असेल त्या त्या पर्यायांचा वापर करत कराड समर्थकांनी सरकारवर तसेच तपास यंत्रणांवर दबाव निर्माणकरण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो प्रयत्न हाणून पाडत आणि कराड समर्थकांचा दबाव झुगारत तपास यंत्रणांनी आपली कारवाई सुरूच ठेवली.
दरम्यान, आतापर्यंत या खून प्रकरणात एकूण ९ आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेतील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.