सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, विष्णू चाटेच्या कोठडीत वाढ
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी विष्णु चाटेच्या (Vishnu Chate) न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज आरोपी विष्णु चाटेची दोन दिवसांची कोठडी संपली होती. त्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी वाढवण्याचे आदेश दिले. विष्णु चाटेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विष्णू चाटे आता 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये राहणार आहे. तर दुसरीकडे विष्णू चाटे हा वाल्मिक कराड (Valmik Karad) याचा मावसभाऊ असल्याची देखील माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
जेव्हा संतोष देशमुख यांचे अपहरण झाले तेव्हा धनंजय देशमुख यांच्याशी चाटेसोबत बोलणं झाले होते. विष्णू चाटेने त्यांना 15 मिनिटांमध्ये सोडतो असं सांगितले होते. त्यावेळी दोघांमध्ये 35 फोन झाले मात्र देशमुख यांची हत्या झाली तेव्हा विष्णू चाटे फोन बंद करुन फरार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर आतापर्यंत कोणतेही कारवाई न झाल्याने मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर आंदोलन केला आणि लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली. सध्या या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केल्याने सध्या या प्रकरणावरून राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे.
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला अन् गुंतवणूकदरांना 12 लाख कोटींचे नुकसान