शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला अन् गुंतवणूकदरांना 12 लाख कोटींचे नुकसान
Stock Market Crash Today : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावा लागत आहे. मात्र नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूकदारांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आज देखील भारतीय बाजारात गुंतवणूकदारांना 12 लाख कोटींचे (Stock Market Crash Today) नुकसान सहन करावे लागले आहे. आज भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 86000 वरून 76000 पर्यंत घसरल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
तर दुसरीकडे बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) हे दोन्ही प्रमुख शेअर बाजार निर्देशांक घसरणीसह बंद झाल्याने अनेक मोठे शेअर्स तोट्यात बंद झाले आहे.
आज सकाळी शेअर बाजार उघडताच बाजारात घसरण सुरु झाली होती आणि व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला . आज व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 1048.90 अंकांनी घसरून 76,330.01 वर पोहोचला. तर निफ्टी50 345.55अंकांनी घसरून 23,085.95 च्या पातळीवर पोहोचला. 4 कंपन्या वगळता, सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांचे इतर सर्व शेअर्स लाल रंगात बंद झाले.
तर दुसरीकडे निफ्टी मिडकॅप 100 हा सत्र 4% ने घसरून 52,383.65 वर बंद झाला. सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी सत्र लाल रंगात बंद झाले. माहितीनुसार, निफ्टी रिअल्टीचा शेअर सर्वात जास्त घसरला, तो 6.6% घसरून 899.75 वर बंद झाला.
… तर न सांगता सगळ्या गोष्टी होणार, धनंजय देशमुखांचा प्रशासनाला इशारा
बँक निफ्टी निर्देशांक 683.55 अंकांनी किंवा 1.40% ने घसरून 48,050.60 वर बंद झाला. व्यापक बाजारपेठेत, मायक्रो-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर अस्थिरता निर्देशांक इंडिया VIX 6.92% वाढून 15.95 वर पोहोचला.