कुंभमेळ्यात शेअर बाजार का घसरतो?; मागील 20 वर्षातील धक्कादायक इतिहास काय…

कुंभमेळ्यात शेअर बाजार का घसरतो?; मागील 20 वर्षातील धक्कादायक इतिहास काय…

Mahakumbh 2025 Stock Market Update : महाकुंभमेळा 2025 हा देशातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी (Mahakumbh 2025) एक आहे. आजपासून या महाकुंभास सुरूवात झालीय. अहवालांनुसार, संगम किनाऱ्यावर 40 लाखांहून अधिक लोकांनी पहिलं स्नान केलंय. या कुंभमेळ्यात, केवळ देशातीलच नाही तर जगभरातील भारतीय आणि परदेशी लोक (Stock Market Update) ‘पवित्र स्नान’ करण्यासाठी येतात. कुंभमेळ्यात पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो, मोक्ष देखील मिळतो असे मानले जाते. पण कुंभमेळ्यादरम्यान शेअर बाजार घसरतो, असं देखील सांगितलं जातंय. गेल्या 20 वर्षात आयोजित केलेल्या कुंभमेळ्यांच्या काळात सेन्सेक्सची स्थिती खूपच वाईट असल्याचे दिसून आलं. आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

तुम्ही खाली या! संतोष देशमुखांच्या भावाला विनवणी करताना जरांगे धाय मोकलून रडले

महाकुंभमेळ्याच्या काळात भारतीय शेअर बाजाराचे (Share Market) एक उदाहरण सॅमको सिक्युरिटीजने सादर केलंय. सॅमको सिक्युरिटीजचे मार्केट पर्स्पेक्टिव्हज अँड रिसर्च प्रमुख अपूर्व शेठ यांनी गेल्या 20 वर्षांतील बाजार कामगिरीचे विश्लेषण केलंय. या काळात तब्बल सहा वेळा कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या अहवालात असं दिसून आलंय की, या सहाही वेळेस कुंभमेळ्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बीएसईच्या मुख्य निर्देशांक सेन्सेक्सचा परतावा नकारात्मक राहिलाय. कुंभमेळ्याच्या 52 दिवसांत सेन्सेक्समध्ये 3.4 टक्क्यांची घसरण झाली.

2015 च्या कुंभमेळ्यात सेन्सेक्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर, जुलै 2015 ते सप्टेंबर 2015 दरम्यान, बीएसई बेंचमार्क निर्देशांक 8.3 टक्क्यांनी घसरला. दुसरी सर्वात मोठी घसरण एप्रिल 2021 च्या कुंभकाळात नोंदवली गेली, जेव्हा सेन्सेक्समध्ये 4.2 टक्क्यांची घसरण झाली. जर सर्वात कमी घसरणीबद्दल विचार केला, तर 2010 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्स 1.2 टक्क्यांनी घसरला होता. 2013 च्या कुंभमेळ्यात 1.3 टक्क्यांनी घट दिसून आली. एप्रिल 2016 मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात त्यात 2.4 टक्क्यांनी घट झाली होती. याचा अर्थ असा की, गेल्या 20 वर्षांत कुंभमेळ्यादरम्यान सेन्सेक्सने सकारात्मक परतावा दिलेला दिसलेला नाही.

नाव मागे घेतलं तर ठीक अन्यथा… सरकारने दंडासह वसुली ; भुजबळांचा लाडक्या बहि‍णींना इशारा

सॅमको सिक्युरिटीजचे अपूर्व शेठ यांनी कुंभमेळ्यानंतरच्या सहा महिन्यांत सेन्सेक्सने 6 पैकी 5 वेळा सकारात्मक परतावा कसा दिला, हे देखील स्पष्ट केलंय. कुंभमेळ्यानंतरच्या सहा महिन्यांच्या कालावधीत सरासरी 8 टक्के परतावा दिसून आला. 2021 च्या कुंभमेळ्यानंतरची ही सर्वात मोठी रॅली आहे. तेव्हा सेन्सेक्स सुमारे 29 टक्क्यांनी वाढला होता. त्याचवेळी 2010 मध्ये, सेन्सेक्समध्ये 16.8 टक्क्यांची चांगली वाढ झाली होती. तथापि 2015 च्या कुंभमेळ्यानंतर बीएसई बेंचमार्क निर्देशांकाने 2.5 टक्के नकारात्मक परतावा दिला होता.

कुंभकाळात आणि नंतर शेअर बाजाराच्या या स्थितीमागे अनेक कारणे असू शकतात, असं मत तज्ञांनी व्यक्त केलंय. कुंभमेळ्यातील ऐतिहासिक खराब कामगिरी लक्षात घेता, गुंतवणूकदार अधिक सावध धोरण स्वीकारू शकतात. आज सेन्सेक्समध्ये एक टक्क्यांहून अधिक म्हणजेच 800 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. सेन्सेक्स सध्या 76,677.06 अंकांवर व्यवहार करत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube