Stock Market : शेअर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्समध्ये ५४५, तर निफ्टीमध्ये १०२ अंकांची उसळी

  • Written By: Published:
Stock Market : शेअर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्समध्ये ५४५, तर निफ्टीमध्ये १०२ अंकांची उसळी

Share Market Update : आज भारतीय शेअर बाजार मोठ्या तेजीसह ग्रीन झोनमध्ये उघडला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बीएसई सेन्सेक्स ५४५.२७ अंकांच्या वाढीसह ८१,७७०.०२ अंकांवर उघडला. तर, दुसरीकडे एनएसई निफ्टी ५० देखील १०२.१५ अंकांनी वधारून २४,९५६.१५ अंकांवर बंद खुला झाला. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजार सकाळच्या सत्रात घसरणीसह उघडला होता. परंतु, नंतर मात्र मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली आणि बाजार ग्रीन झोनमध्ये बंद झाला.

Video : तुळजापूरसह जिल्ह्याचा कायापालट करणार; उमेदवारी जाहीर होताच काय म्हणाले राणा पाटील?

आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्सचे ३० पैकी २१ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि ९ शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे निफ्टी ५० कंपन्यांपैकी ३१ कंपन्या तेजीसह तर १९ कंपन्या घसरणीसह व्यवहार करत होत्या. सेन्सेक्समध्ये टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक ३.२६ टक्क्यांनी वधारले तर कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सर्वाधिक २.९९ टक्क्यांनी वधारले.

या शेअर्समध्ये तेजी

एचडीएफसी बँक २.८८ टक्के, अॅक्सिस बँक १.१५ टक्के, आरआयएल ०.८० टक्के, एशियन पेंट्स ०.७९ टक्के, एचसीएल टेक ०.७८ टक्के, टाटा स्टील ०.७७ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.६७ टक्के, टायटन ०.६१ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.६१ टक्के, एसबीआय ०.५८ टक्के, जेएसडब्ल्यू ०.५६ टक्के आणि मारुती सुझुकी ०.५४ टक्क्यांनी वधारले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, इन्फोसिस, पॉवरग्रिड, टाटा मोटर्स, एनटीपीसी, नेस्ले इंडिया आणि बजाज फायनान्सचे शेअर्सही ग्रीन झोनमध्ये होते.

Video : तुळजापूरसह जिल्ह्याचा कायापालट करणार; उमेदवारी जाहीर होताच काय म्हणाले राणा पाटील?

भारती एअरटेल ०.९१ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.३१ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.२२ टक्के, आयटीसी ०.१३ टक्के, एचयूएल ०.०९ टक्के, टीसीएस ०.०८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.०२ टक्के आणि इंडसइंड बँक ०.०१ टक्क्यांनी घसरले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube