शेअर मार्केटने रचला नवा इतिहास, सेन्सेक्सनं 74 हजारांचा टप्पा केला पार

शेअर मार्केटने रचला नवा इतिहास, सेन्सेक्सनं 74 हजारांचा टप्पा केला पार

Share Market : भारतीय शेअर मार्केटने (Share Market)आज पुन्हा इतिहास रचला आहे. शेअर मार्केटने आज ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या तासात अचानक सुसाट वेग घेतला. आजच्या व्यवहारात प्रथमच बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex)74 हजारांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही (NSE Nifty)आजच्या सत्रात 22,490 चा नवा उच्चांक गाठला. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 409 अंकांच्या वाढीसह 74,086 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 118 अंकांच्या वाढीसह 22,474 अंकांवर बंद झाला.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी घेतली अमित शाह यांची भेट, पाहा फोटो

शेअर मार्केटने आज नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला पण दुसरीकडं आजच्या सत्रात बाजाराचं मूल्य घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सची मार्केटकॅप 391.37 लाख कोटी रुपयांवर घसरली आहे.

धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, पाहा संपूर्ण टीम

मागील ट्रेडिंग सत्रात तीच मार्केट कॅप 393.04 लाख कोटी रुपये होती. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणुकदारांना मात्र 1.67 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

आज सकाळी भारतीय शेअर बाजार चांगलाच ढेपाळलेला पाहायला मिळाला. काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकदारांना चागंलाच फटका बसला आहे. पण आजच्या ट्रेडिंग सत्रात खालच्या पातळीवरुन सावरला आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदीमुळे बंद झाला. बँक निफ्टी 384 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

याशिवाय ऑटो, आयटी, फार्मा, पीएसयू बँका, एफएनसीजी, हेल्थकेअर क्षेत्रातील समभाग तेजीने बंद झाले. तर तेल आणि वायू, इन्फ्रा, ऊर्जा, मीडिया, रिअल इस्टेट, मेटल क्षेत्रातील समभाग घसरून बंद झाले.

बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांत मिडकॅप निर्देशांक 1000 अंकांनी तर स्मॉल कॅप निर्देशांक 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला होता.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह बंद झाले आहेत. बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, भारती एअरटेलचे शेअर्स मोठ्या वाढीसह बंद झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube