विष्णू चाटेचा मोबाईल कुठंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID समोर मोठं आव्हान

विष्णू चाटेचा मोबाईल कुठंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID समोर मोठं आव्हान

Santosh Deshmukh Murder Vishnu Chate Mobile Missing : बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींमधील विष्णू चाटेने (Vishnu Chate) त्याचा मोबाईल अजून पोलिसांच्या हवाली केला नाहीये. पोलिसांनी इतर आरोपींचे मोबाईल जमा करून घेतले आहेत. विष्णू चाटेने त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे त्याच्या फोनमध्ये नक्की कोणतं सिक्रेट दडलंय, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी पाच मोबाइल जप्त केलेत. हे सर्व जप्त केलेले मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेत. मात्र आरोपी विष्णू चाटे (Beed Crime) याने मोबाईल न दिल्यामुळं गुढ आणखीन वाढलंय. आरोपी विष्णु चाटेचा मोबाईल अजून सीआयडीला सापडलेला नाहीये. याप्रकरणी विष्णू चाटेचा फोन सापडल्यास अनेक प्रश्नांची उकल होईल, असं पोलीस म्हणत आहेत.

महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नव्हतो…स्वतंत्र निवडणुका लढण्यावर राऊत काय म्हणाले?

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं स्वत:चा मोबाईल नाशिकमध्ये फेकून दिल्याचं पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलंय. मात्र, विष्णूने हा मोबाईल नेमका कुठे फेकला? हे पोलिसांनी विचारले असता त्याने ते ठिकाण आठवत नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे चाटेचा मोबाईल सीआयडी यंत्रणेला सापडत नाहीये. विष्णू चाटेच्या मोबाईलवरुनच वाल्मिक कराडला फोन केल्याचा संशय व्यक्त केला गेलाय. याच फोनवरून खंडणीची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तपासात विष्णु चाटेचा मोबाईल अतिशय महत्वाचा आहे.

हात जोडतो, पाया पडतो.. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका; खैरे थेट व्यासपीठावर नतमस्तक

बीडमधील संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात विष्णु चाटेचा मोबाईल हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. कारण विष्णूच्या मोबाईलवरून वाल्मिक अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलता होता. त्याने 2 कोटींच्या खंडणीसोबत हात-पाय तोडण्याची देखील धमकी दिली होती. अशी ऑडिओ क्लिप देखील पोलिसांना सापडल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे या तपासात विष्णू चाटेचा मोबाईल अत्यंत महत्वाचा आहे. पण विष्णू चाटे हा फोन फेकल्याचं सांगत आहे. त्यामुळे त्याचा मोबाईल शोधणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात विष्णू चाटेला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. मात्र कृष्णा आंधळे हा अजून देखील फरार आहे. राज्याबाहेर देखील सीआयडी पथक कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत. तसेच विष्णू चाटेला 8 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी केलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube