हात जोडतो, पाया पडतो.. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका; खैरे थेट व्यासपीठावर नतमस्तक
Chandrakant Khaire : विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी दोन्ही आघाड्यांनी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने या निवडणुका स्वबळावर लढण्याची कालच केली होती. ठाकरे गटाच्या या गुगलीने महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. याच घडामोडी घडत असताना ठाकरे गटाला गळती लागली आहे. पदाधिकारी, नेते एक एक करून जय महाराष्ट्र करू लागले आहेत. ही परिस्थिती पाहून शिवसेनेचे जुने नेते आणि शिवसैनिक हळहळू लागले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर थेट व्यासपीठावरच नतमस्तक होत उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका अशी आर्त साद घातली आहे.
आता ठरलं! मुंबई ते नागपूर.. मनपा निवडणूक स्वबळावरच लढणार; ठाकरे गटाची घोषणा
छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांना कळकळीची विनंती केली. पक्षाला सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका असे म्हणत खैरेंनी हात जोडले आणि थेट व्यासपीठावरच नतमस्तक झाले. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते.
मी हात जोडून सर्वांना विनंती करतो. तुम्हाला इथं दंडवत घालतो, उद्धव ठाकरेंकडं आपल्याला पहायचं. परवाच्या कार्यक्रमा ते किती कळकळून बोलले होते. म्हणून आता मी तुम्हाला विनंती करतो, कुठेही सोडून जाऊ नका. एकत्र मिळून काम करू. माझं काही चुकलं तर बोललात तरी हरकत नाही. माझी विनंती आहे थांबा. आपल्याला उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करायचं आहे. त्यांच्या नेतृत्वात आपण जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका नक्कीच जिंकू असा विश्वास व्यक्त करत खैरे थेट व्यासपीठावरच नतमस्तक झाले.
गड आला पण सिंह गेला; विधानसभेला फिनिक्स भरारी घेऊ, अंबादास दानवे, खैरेंची आढावा बैठक