कल्याण-डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांचा करिष्मा; तब्बल 15 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध

अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या वाढत गेली असून, आता एकूण 15 भाजप उमेदवार बिनविरोध.

कल्याण डोंबिवलीत भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध

कल्याण डोंबिवलीत भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध

BJP candidates unopposed in 8 seats in Kalyan-Dombivli : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण(Ravindra Chanvan) यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपने विजयाचा शंखनाद फुंकला आहे. सुरुवातीला दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानंतर पक्षाने पहिल्या विजयाचा जल्लोष केला होता. त्यानंतर रविंद्र चव्हाण प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप(BJP) उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजपने केडीएमसीत(KDMC) विजयाची हॅट्रिक साधली होती. यानंतर अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या वाढत गेली असून, आता एकूण 15 भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर, शिंदेंच्या शिवसेचे(Shivsena) 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजप- शिवसेना महायुतीचे एकूण 19 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांच्यानंतर रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्याने भाजपने केडीएमसी महापालिकेत तिसरा मोठा विजय नोंदवला होता. गुरुवारपर्यंत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या बिनविरोध जागांची संख्या वाढली. प्रभाग 26 अ मधून मुकुंद पेडणेकर बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच प्रभाग 28 मधून भाजपचे महेश पाटील बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रभागातून मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महेश पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. याशिवाय, प्रभाग क्र. 19 (क) मधून भाजप-महायुतीचे साई शिवाजी शेलार हेही बिनविरोध विजयी झाले आहेत.
अहिल्यानगरमध्ये भाजपची गाडी सुसाट; भाजपच्या 3 तर राष्ट्रवादीच्या 2 जागा बिनविरोध
केडीएमसी महापालिकेत एकूण 122 जागा असून बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. त्यापैकी भाजप-शिवसेना महायुतीचे 19 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने आता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महायुतीला केवळ 50 जागा जिंकण्याची गरज आहे. त्यामुळे केडीएमसीत भाजप–शिवसेना महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

1) रंजना पेणकर – 26 ब
2) आसावरी नवरे – 26 क
3) मंदा पाटील- 27 अ
4) ज्योती पाटील- 24 ब
5) रेखा चौधरी- 18 अ
6) मुकंद तथा विशू पेडणेकर- 26 अ
7) महेश पाटील 27 ड
8) साई शेलार 19 क
9) दिपेश म्हात्रे- 23 अ
10) जयेश म्हात्रे- 23 ड
11) हर्षदा भोईर- 23 क
12) डॉ.सुनिता पाटील- 19 ब
13) पूजा म्हात्रे- 19 अ
14) रविना माळी- 30 अ
15) मंदार हळबे- 26 ड

शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले उमेदवार

1)रमेश म्हात्रे

2)विश्वनाथ राणे

3)हर्षल मोरे

4)वृषाली जोशी

5)रेश्मा निचल

6)ज्योती राजन मराठे

Exit mobile version