पक्षविरोधी भूमिका महागात! भाजपकडून तब्बल 69 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

संबंधित कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी पक्षाशी असलेले सर्व संबंध तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आले आहेत.

Untitled Design 17

Untitled Design 17

BJP expels 69 people for six years : राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे . पक्षविरोधी भूमिका घेत निवडणूक लढणाऱ्या तब्बल 69 कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा ठाम संदेश पक्षाने दिला आहे. अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे किंवा पक्षविरोधी भूमिका घेणे हा गंभीर शिस्तभंग मानला जातो.

 

या निर्णयामुळे संबंधित कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी पक्षाशी असलेले सर्व संबंध तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई त्वरित लागू करण्यात आली असून, संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे देखील पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाध्यक्षांनी देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाणाऱ्या कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा संदेश देण्यात आला आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2026 – दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल

त्यामुळे पक्षातील शिस्त आणि संघटनात्मक एकात्मता टिकवण्यासाठी भाजपने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, पक्षांतर्गत शिस्त राखण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे. या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पक्षातील हकालपट्टी केलेल्या कार्यकर्त्यांची नावं –

कसबा विधानसभा मतदारसंघ
धनंजय जाधव, चंद्रकांत पोटे, कादंबरी साळवी, जितेंद्र दळवी, किशोर तरवडे

कोथरूड विधानसभा मतदारसंघ
अमोल बालवडकर, सोमनाथ गुंड, मानसी सोमनाथ गुंड, अनिता तलाठी, पल्लवी गाडगीळ, दत्ता भगत, विनोद मोहिते

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
रमेश भंडारी, समाधान शिंदे, मधुकर मुसळे, प्रकाश ढोरे, बाळासाहेब रानवडे, मंजू वाघमारे, प्रीती वालेकर

हडपसर विधानसभा मतदारसंघ
संदीप लोणकर, स्मिता गायकवाड, संतोष शिंदे, युवराज कुचेकर, इम्तियाज मोमीन, अण्णा दारवटकर, पुरषोत्तम अण्णा दारवटकर, अभिजित डोंगरे, छाया गदादे, नवल कुंजीर, समीर पठाण, प्रणव मोरे, योगेश सूर्यवंशी, अश्विनी योगेश सूर्यवंशी, नलिनी मोरे, संगीता ठोसर, अनिल मेमाणे, नितीन मारकड, सतीश मारकड, वर्षा मारकड

खडकवासला विधानसभा मतदारसंघ
रुपेश घुले, बाप्पू पोकळे, किरण बारटक्के, अमोल रायकर, संदीप पोकळे, मोहिनी देवकर, रितेश रासकर, सचिन दशरथ दांगट, सुरेंद्र कंधारे

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
संदीप जऱ्हाड, सुनीता गलांडे, किशोर वाघमारे, विजय चौगुले, अन्वर पठाण, ऐश्वर्या जाधव, राजू साखरे, जितेंद्र जगताप

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
प्रवीण खेडकर, स्मिता खेडकर, उज्वला गौड, बाळासाहेब घोडके, सुरेश धनगर, स्वाती धनगर, सुवर्णा भरेकर, पल्लवी केदारी, राहुल शर्मा

पर्वती विधानसभा मतदारसंघ
हरीश परदेशी, बंडू जायभाय, नीता थोरवे, प्रीतम नागापुरे

Exit mobile version