BJP fears split in Legislative Council corporators directly to Goa, tour plan revealed : राज्यातील विधान परिषद निवडणुकीची (MLC) रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यामध्ये 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकणी अद्यापही बंडखोरांना शांत करणे आणि त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान आता भाजपला देखील मत फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे.
मत फुटण्याची भीती भाजपने घेतला मोठा निर्णय!
विधान परिषदेत भाजपलाही मत फुटण्याची भीती निर्माण झाल्याने भाजप आता आपल्या नागपुरातील नगरसेवकांना थेट गोव्याला नेणार आहे. यासाठी तीन दिवसांची टूर आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर तीन दिवस मुंबईतम मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यात येणार आहे. तसेच दोन दिवसांचं शिबिर देखील आयोजित करण्यात आलं आहे. तसेच 17 जूनला म्हणजे मतदानाच्या एक दिवस अगोदर हे नगरसेवक नागपूरला परत येणार आहेत. या टूरचा प्लॅन देखील समोर आला आहे.
टूरचा प्लॅन देखील समोर…
10 जूनला रेल्वेने नागपूरहून मुंबईला रवाना.
11 जूना मुंईतून गोव्याला जाणार.
13 जूनपर्यंत गोव्यात राहणार.
14 जूनला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार.
15 आणि 16 तारखेला रामभाऊ म्हळदी प्रबोधिनी येथे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
17 जून म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी नागपूरला परत येणार
18 जूनला विधान परिषद मतदान होणार आहे. तसेच या टूरचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी या नगरसेवकांकडूनच पैसे घेण्यात आलं आहे.
