Rohit Pawar : एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असणाऱ्या पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर महायुतीकडून जोरदार टीका होताना दिसत आहे. राजकीय फायद्यासाठी रोहित पवार या आंदोलनाचा वापर करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता भाजप नेते आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्याबाबत मोठा दावा केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार कर्जत -जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचा दावा नवनाथ बन यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
माध्यमांशी बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, रोहित पवार (Rohit Pawar) यांना आंदोलन फ्लॉप होत असल्याचे लक्षात आल्यावर कालपासून बारामतीमधील लोकांना पुण्यात बोलावून घेतलं आहे. त्यांच्या माध्यमातून गर्दी जमवली जात आहे. रोहित पवार आता कर्जत – जामखेडमधून निवडणूक लढवणार नाही. तिथे पराभव होईल. त्यांचा पुण्यातील एका मतदारसंघावर डोळा असेल किंवा बारामती (Baramati) मतदारसंघावर डोळा असेल. त्यासाठी रोहित पवारांनी पुण्याला (Pune) केंद्र बनवलं आहे. आंदोलनाला 20 टक्के विद्यार्थी तर 80 टक्के कार्यकर्ते आहेत असं माध्यमांशी बोलताना नवनाथ बन म्हणाले.
पुढे बोलताना नवनाथ बन म्हणाले की, चार दिवस कुणी फिरकलं नाही. काल दोन-तीन हजार लोकांची गर्दी जमवली. आज देखील गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. आज देखील आजूबाजूच्या पार्किंगचा आढावा घेतला तर लक्षात येईल की पुण्याच्या गाड्या आहेत किंवा बाहेरच्या गाड्या आहेत. अलिशान कारमधून येणारे विद्यार्थी आहेत का? या आंदोलनासाठी किती उधळपट्टी केली, रोहित पवारांनी सांगावी.
ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्यांदा भिडणार भारत – पाकिस्तान; ‘या’ दिवशी होणार सामना
तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहात. विद्यार्थ्यांच्या नावावर आंदोलन करत असल्याची टीका नवनाथ बन यांनी माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांच्यावर केली.
