तनपुरे यांच्या उमेदवारीला भाजपच्या ‘या’ नेत्याचा विरोध, थेट फडणवीसांची भेट घेणार

सत्यजित कदम यांनी तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला आपला विरोध नाही मात्र त्यांना उमेदवारी देण्यावरून आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं.

Untitled Design 1 4

Untitled Design 1 4

BJP leader opposes Tanpure’s candidature : विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून अहिल्यानगर मध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावरून चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब होण्याची चर्चा सुरू आहे मात्र यावरून भाजपचे निष्ठावंत असलेले सत्यजित कदम यांनी नाराजी व्यक्त करत तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला आपला विरोध नाही मात्र त्यांना उमेदवारी देण्यावरून आपला विरोध आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कदम म्हणाले.

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया ही पार पडणार असून अहिल्यानगर येथील जागेवरून आता चांगलेच वातावरण तापताना दिसून येत आहे राष्ट्रवादीच्या असलेल्या या जागेवरती भाजपने दावा केला असून ही जागा भाजपच लढवणार असल्याचा देखील भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे यातच उमेदवारी वरून अनेक इच्छुकांची नावे समोर आलेले असताना अनेकांनी भाजप षष्ठींचे भेटीगाठी येण्यास सुरुवात केली यातच देवळाली प्रवाराचे माजी नगराध्यक्ष राहिलेले सत्यजित कदम यांनी देखील आपण इच्छुक असल्याचे बोलून दाखवले

मात्र राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डीले यांच्या उमेदवारीसाठी माघार घेतलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्ता तनपुरे यांचे नावाची जोरदार चर्चा आहे तसेच येत्या दोन दिवसांमध्ये तनपुरे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मात्र त्यांच्या उमेदवारीवरून आता भाजपचे निष्ठावंत असलेले कदम यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.

इराणचा कुवेतवर हल्ला तर लेबनॉनमध्ये इस्रायलचा एअर स्ट्राईक, अमेरिका-इराण संघर्षानंतर परिस्थिती आणखी चिघळली

आपण निष्ठावंत म्हणून आपल्याला संधी मिळावी असं कदम यांनी बोलून दाखवले तसेच तनपुरांच्या भाजप प्रवेशाला माझा विरोध नाही मात्र त्यांना पक्षातून प्रवेश देऊन थेट उमेदवारी देण्याला माझा विरोध आहे पक्षाने निष्ठावंतांचाही विचार करायला हवा अशी भूमिका कदम यांनी मांडली तसेच मला पक्षाचा एबी फॉर्म नाही दिला तरी चालेल मात्र निवडणूक लढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कदम यांनी केल्याचे समजते आहे.

मुख्यमंत्री कदमांची समजूत काढणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आज सत्यजित कदम यांच्याशी चर्चा करणारा असून या बैठकीतून कदम यांचे असलेली नाराजी दूर करणार असल्याचे देखील सांगितले जाते. दरम्यान भाजपकडून निष्ठावंत असलेल्या गटाकडून काही नावं समोर आली तर दुसरीकडून तनपुरे यांना भाजपात प्रवेश देण्या साठी एक गट सक्रिय होता यामुळे भाजपातील पक्षांतर्गत असलेले समोर आली

लग्नासाठी काहीही! पुण्यात तरुणाचे अपहरण करून बीडला नेले, तरुणीसह 7 जणांना अटक

तुल्यबळाच्या जोरावर भाजप वरचढ

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकट्या भाजपकडे 461 पैकी 199 मतदारांची संख्याबळ आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडून भाजपने खेचून आणण्यात यश मिळाले तसेच महायुती मधील घटक पक्षाची मदतीशिवाय देखील भाजप विधान परिषदेला आपल्या उमेदवाराला निवडून आणू शकते कारण सत्यजित तांबे यांची संगमनेर सेवा समितीचे मत तसेच प्राजक्त तनपुरे यांच्या जनसेवा पॅनलचे मते देखील भाजपच्या बाजूने पडू शकतात व या जोरावरच भाजप ही निवडणूक सहज जिंकू शकते असं चित्र सध्या दिसून येत आहे.

तनपुरे यांचा उद्या भाजपात पक्षप्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक तनपुरे यांचा भाजपात प्रवेश होईल अशा चर्चा सुरू होत्या अखेर 30 मे रोजी तनपुरे यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समजते आहे तसेच भाजपकडून तनपुरे यांनाच विधान परिषदेची उमेदवारी देखील देण्यात येणार असल्याचे देखील चर्चा आहे विशेष म्हणजे तनपुरे यांच्यासाठी थेट दिल्लीहून ग्रीन सिग्नल आला असून त्यांचे पक्षप्रवेशासाठी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक होत तनपुरेंच्या पक्षप्रवेशावर व उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला असल्याचा समजत आहे.

Exit mobile version