नाशिक : पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आणि राज्यात आगामी काळात स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये (nashik) २ दिवसांपासून भाजपचं बैठक सुरू आहे. मागील काळात काय रणनीती असावी, यावर सध्या चर्चा सुरू आहे. आजच्या या बैठकीत भाजप (bjp) आणि शिंदे गटाचा (Shinde group) राज्यात २०० चा नारा राहणार आहे.
भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून (कालपासून) नाशिकमध्ये सुरू झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबरच भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी चर्चा करताना दिसून आले. आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात २०० चा नारा असणार आहे. लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधानसभेसाठी मिशन २०० असा नारा आजच्या कार्यकारणीत बैठकीत होणार आहे. या कार्यकारिणी बैठकीत लोकसभा- विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे.
काल या बैठकीत लोकसभा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेंड्स ऑफ बिजेपी, धन्यवाद मोदीजी, मतदार नोंदणी, डेटा व्यवस्थापन, युवा वॉरीयर्स, सोशल मीडिया आणि त्याचा वापर आणि विधानसभा प्रवास या विषयांचा आढावा घेण्यात आला. तर आज दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. आज बडे नेते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राजकीय आणि कृषी क्षेत्रासह अनेक विषयांवर ठराव पारित होणार आहेत. त्याकरिता राज्यातील सर्व भाजप मंत्री आणि हजाराहून जास्त पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सुनावणी होणार आहे. आणि निवडणूक आयोगातही पक्षाच्या चिन्हावर सुनावणी होणार आहे. यामुळे या कार्यकारिणी बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.