Nitesh Rane on Nagpur violence : नागपूर येथे झालेल्या आंदोलना संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन केलं होत. त्यानंतर दुपारी विषय संपला होता. मात्र, संध्याकाळी काही जण आंदोलनला आले. (violence) त्यामुळं हे पूर्वनियोजित आहे असा वास येतोय. पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यावर हल्ला का केला? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
यातील एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. ही काय पद्धत आहे. आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मात्र, हा कोणता प्रकार आहे. सभागृहात कोणीही बोलत नाही. पायऱ्यांवर काय होत बोलून. या ठिकाणी ट्रकभर दगड आले कुठून या सगळ्याची चौकशी होईल. पाकिस्तानतल अब्बा आठवणीत येईल असी कारवाई होईल असंही राणे म्हणालेत. यामध्ये जिहादी मानसिकतेचे कार्टे आहेत त्यांना चोप देणार. या सगळ्याची सुरूवात अबू आझमीने केली असंही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे. माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? त्याची चिंता तू करायची नाही. माझ्या तोंडी कोणी लागू नये, असा टोला नीतेश राणे यांना विरोधकांना लावला. आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपला महाराष्ट्राला पेटता मणिपूर करायचे आहे, त्यावर बोलताना राणे म्हणाले, त्या व्यक्तीला पेटवणे काय हे माहिती नाही. त्यांना आधी कंठ तरी फुटू द्या, असा टोला नितेश राणे यांनी लावला.
नितेश राणे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पायऱ्यांवरील आंदोलन झाले. त्यावर नितेश राणे म्हणाले, सभागृहाबाहेर काय झाले त्याला मी उत्तर देत नाही. सभागृहात कोणीही माझा राजीनामा मागितला नाही. त्यांना उत्तर मी त्या ठिकाणी दिले असते. पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्यांना हवे तर नास्ता द्या. मत्स खात्याचा मंत्री म्हणून मी मासे पाठवतो, असा टोला राणे यांनी लगावला.