Download App

अजित पवारांच्या कटाचा मी बळी ठरलो; भाजपने गांभिर्यानं घ्यावं, राम शिंदेंनी सांगितलं पराभवाचं कारण

राज्यात सर्वात कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा नंबर लागतो. मी कटाचा आणि अघोषित कराराचा बळी ठरलो

  • Written By: Last Updated:

Ram Shinde Allegations Against Ajit Pawar : भाजपचे राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात निसटता पराभव झाला आहे. त्यानंतर ते आणखी उघड बोलले नव्हते. दरम्यान, त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Ram Shinde ) महायुतीत अजित पवार यांनी युतीचा धर्म पाळला नसल्याचे आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत राम शिंदे यांनी केलेल्या आरोपांनी आता खळबळ उडाली आहे.

कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार हे १२४३ मतांनी विजयी झाले. रोहित पवारांची भेट होताच अजितदादांनी मिश्किलपणे मी सभा घेतली असती तर अडचण झाली असती असं विधान केलं. या विधानानंतर भाजप नेते राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर नियोजीत कटाचा आरोप केला. राजकीय सारीपाटावर कट रचला गेला आणि त्यात माझा बळी गेला असा आरोप राम शिंदेंनी केला असून पत्रकार परिषदेत त्यांना भावना अनावर झाल्या. अजित पवार यांच्यावर आरोप करताना राम शिंदेंना रडू कोसळलं.

भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी पैसे वाटप; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!

राज्यात सर्वात कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा नंबर लागतो. मी कटाचा आणि अघोषित कराराचा बळी ठरलो हे सिद्ध झालंय. वरिष्ठांकडे तक्रार करण्यासंदर्भात सांगायचं तर महायुतीसाठी हे चांगलं नाही. माझ्यासाठी तर नाहीच नाही. यावर वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई केली पाहिजे ही अपेक्षा राम शिंदे यांनी व्यक्त केली. राम शिंदे यांनी म्हटलं की, महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भात पक्षाकडे आणि अजित दादांकडे मागणी करत होतो. आता अजितदादांनी स्वत: सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं. याचा अर्थ हा नियोजित कट होता असंही ते म्हणाले आहेत.

दुसरं म्हणजे आमदार रोहित पवार स्वत:ला भावी मंत्री, मुख्यमंत्री समजतात. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत स्वता:चा, कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही. त्याचाही प्रत्यय आला. राजकीय सारीपाटात जे झालं त्याचा मी बळी ठरलो. मी अगोदरच सांगितलंय, जाहीरपणे बोलण्याची माझी इच्छा नव्हती. पण दादाच जर बोलले तर मला बोलण्याशिवाय पर्याय नाही. कौटुंबिक कलहाच्या दरम्यान जे अघोषित करार झाले त्यांची अंमलबजावणी कर्जत जामखेडमध्ये दिसली. त्यांच्या पक्षाचा अजेंडा असेल, पण महायुतीचा धर्म पाळणं अपेक्षित आहे असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

follow us