Download App

‘खऱ्या मर्दांसारखे निवडणूकीच्या रिंगणात या…’ भाजपच्या आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान

BJP’s Ashish Shelar Challenge To Uddhav Thackeray : खऱ्या मर्दांसारखे निवडणूकीच्या रिंगणात या, असं मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) खुलं आव्हान दिलंय. ठाकरेंचा पक्ष निवडणुकीला (BMC Election) घाबरणारा आहे. तसंच तथाकथित मर्दांच्या पक्षांचा कारभार, असा टोला त्यांनी लगावला आहे.

सोशल मिडिया पोस्ट करत आशिष शेलार यांनी म्हटलं की, मुंबई महापालिकेची वेळेवर निवडणूक न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली.नवीन जनगणना झाली नसताना मुंबई ( Maharashtra Politics) महापालिकेची 227 ची वॉर्ड रचना बदलून मनमानी करीत 236 ची वार्ड रचना केली. घोळ घालून निवडणूक लांबवली. 236 वॉर्ड रचनेचा हट्ट करून उच्च न्यायालयात याचिका उबाठा सेनेनेच दाखल केली आणि निवडणूक रोखून धरली.

पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका! फक्त 24 तासांत सोशल मीडिया खात्यांवर भारतात पुन्हा बंदी

पुन्हा निवडणूक लांबवण्याचा डाव?

आता मा. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घ्या, असे स्पष्ट निर्देश दिले. निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली. यापुर्वीच निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आणि दोन निवडणूका लढल्यानंतर आता पुन्हा चिन्ह, आणि पक्षाचे नाव याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या आहे. पुन्हा निवडणूक लांबवण्याचाच डाव आखलेला दिसतोय. निवडणूकीला घाबरणारा हा पक्ष आहे, तथाकथित मर्दांच्या पक्षांचा कारभार, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.

नाशकात ठाकरे गटाला सुरुंग! चार दिवसांपूर्वी पद दिलेला ठाकरेंचा नेताही भाजपने फोडला

मुंबईकरांसाठी भाजपाच

मुंबईकरांसाठी भाजपाच लढणारा पक्ष असल्याचं देखील शेलारांनी म्हटलंय. आशिष शेलार यांनी उबाठा सेनेला खुलं आव्हान दिलंय. हिम्मत दाखवा, मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा. हिंम्मत असेल तर, खऱ्या मर्दांसारखे निवडणूकीच्या रिंगणात या. या शब्दांमध्ये आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ललकारलं आहे.

निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू आहे. तरीही पुरेशा वॉर्ड रचनेपासून चिन्ह किंवा पक्षनामापर्यंत अनेक याचिका न्यायालयात आहेत. यामुळे निवडणूक पुन्हा थांबवण्याचा धोका कायम आहे. निवडणूक आयोगाने डिलिमिटेशन पूर्ण करून नोव्हेंबरमध्ये मतदानासाठी तयारी सुरू केली आहे, मात्र न्यायालयीन प्रक्रियांमुळे कोठे स्टॉप लागेल, हे सांगता येत नाही.

 

follow us