BMC Election : मुंबईत महापौर कुणाचा याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असून पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असून लवकरच महापौर पदाबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तर दुसरीकडे आता भाजप (BJP) आणि शिवसेने शिंदे (Shivsena) गटातील कार्यकर्त्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांनी पराभवानंतर भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहे. प्रभाग क्रमांग 194 मधून शिवसेना शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी ठाकरे गटाते निशिकांत शिंदे (Nishikant Shinde) विरुद्ध निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत भाजपच्या स्थानिक टोळीमुळे माझा पराभव झाला असा आरोप त्यांनी केला आहे. निशिकांत शिंदेंनी या प्रभागात समाधान सरवणकर यांचा 582 मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी माझ्याविरोधात प्रचार केल्याने माझा पराभव झाला असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे.
तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेना ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. या पराभवासाठी देखील भाजपची एक विशिष्ट टोळी काम करत होती असा आरोप देखील सरवणकरांनी यावेळी केला आहे. तर प्रभाग क्रमांक 190 मधील भाजपच्या शीतल गंभीर आणि 191 मधील प्रिया सरवणकर यांच्या पराभवामागे देखील भाजप असल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
उत्पन्नात चढ-उतारांसह ‘या’ 4 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार ?
माहीम सदा सरवणकरांचा बालेकिल्ला मानला जातो. 2004, 2014 आणि 2024 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत या मतदासंघातून बाजी मारली आहे मात्र शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आधी विधानसभेत त्यांचा पराभव झाला तर आता महापालिका निवडणुकीत त्यांची दोन्ही मुलं समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
