Download App

मोठी बातमी : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला दिलासा; मुंबई HC ने मंजूर केला जामीन

अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घेत होते असा खळबळजनक आरोप तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केला होता.

  • Written By: Last Updated:

मुंबई : कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात बडतर्फे करण्यात आलेले पोलीसअ अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात कोर्टाने वाझे यांना हा जामीन मंजूर केला आहे. वाझे यांना केवळ वसुली प्रकरणात जामीन देण्यात आला असून, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणात वाझे यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे जामीन मिळाल्यानंतरही वाझे यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. (Bombay HC Grants Bail To Dismissed Police Officer Sachin Waze)

 

राज्याचे पोलिस महासंचालक परमबीर सिंंग आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत, त्यामुळे सचिन वाझे यांनीही जामिनासाठी याचिका केली होती. जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने 23 ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने वाझेला कथित 100 कोटींच्या  वसुली प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल; सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

जामीन मिळूनही मुक्काम तुरूंगातच राहणार

वाझे यांना केवळ कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात जामीन देण्यात आला आहे. तर,  मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटेलिया स्फोटक प्रकरणात वाझे यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे जामीन मिळाल्यानंतरही वाझे यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.

Assembly Election : मोक्याच्यावेळी अजितदादांना मोठा धक्का; पवारांनी ‘नाना’ म्हणत ‘काटे’ फिरवले

सचिन वाझेंच्या पत्रात नेमकं काय ?

सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत, असा दावा सचिन वाझेंनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे असेही वाझे यांनी सांगितले. यामध्ये आणखी कुणा नेत्याचं नाव आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारलं असता सचिन वाझेंनी जयंत पाटील यांचं नाव घेतलं. आता जयंत पाटील यांचं नाव वाझेंनी घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

follow us