Download App

ऑनलाइन रमी जुगार नसून ‘कौशल्याचा खेळ’ कसा?; शपथपत्र दाखल करा, मुंबई HC चे निर्देश

  • Written By: Last Updated:

मुंबई : ऑनलाइन रमी जुगार नसून ‘कौशल्याचा खेळ’ कसा? याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश मुंबई HC ने राज्य सरकार आणि संबंधित गेमिंग ॲपला दिले आहेत. जंगली रमी आणि रमी सर्कल या ऑनलाईन खेळांच्या ॲपवर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी सोलापूरस्थित सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांनी जनहित याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने ही याचिका सुनावणीयोग्य आहे की नाही तसेच ऑनलाइन रमी हा संधीचा खेळ न मानता कौशल्याचा खेळ का मानला जातो हे स्पष्ट करण्याचे आदेश प्रतिवाद्यांना दिले आहेत.

दाखल याचिकेत नेमकं काय?

सोलापूरस्थित सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, जंगली रम्मी आणि रम्मी सर्कल सारखे ॲप्स हे एकप्रकारे ऑनलाइन जुगार आहेत, जे सार्वजनिक जुगार कायदा, 1867, बॉम्बे जुगार प्रतिबंधक कायदा, 1887 आणि बॉम्बे वेजर कायदा अंतर्गत प्रतिबंधित गुन्हा आहे. याशिवाय दाखल याचिकेत सेलिब्रेटी, क्रिकेटपटू यांच्यातर्फे या ऑनलाईन खेळांच्या जाहिराती करण्यालाही आक्षेप घेण्यात आला आहे.

Video : मोदींच्या हस्ते नव्हे तर…; शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोच्या लोकार्पणाची तारीख अन् वेळ ठरली!

राष्ट्रपती, पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांकडून  प्रतिसाद मिळाला नाही 

याचिकेत ननावरे यांनी जंगली रमी आणि रमी सर्कल यावर बंदी घालावी यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह विविध उच्चस्तरीय कार्यालयांना निवेदने दिली होतीय मात्र, त्यांच्याकडून कोणताही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आणि कारवाई न झाल्याने न्यायालयात धाव घेतल्याचे याचिकेत नमुद करण्यात आले आहे.

पावसाचे धुमशान! पुणे, पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी; आज ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती एमएम साठये यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने राज्य सरकार आणि प्रतिवाद्यांना ऑनलाइन रम्मी हा संधीचा खेळ नसून कौशल्याचा खेळ कसा आहे याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

follow us