Book Street : रविवारच्या पहाटेचा गारवा आणि सकाळचे ऊन या दोन्हींवर मात करत ९००० हून अधिक पुस्तकप्रेमी रसिकांनी फडके रोडजवळील, नेहरु रोड डोंबिवली पूर्व येथे बुक स्ट्रीटचा आनंद घेतला. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून भारतातील पहिल्या बुक स्ट्रीटचे पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५ ते १० या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ५ वाजता सुरुवात झाली तेव्हा ४० रसिक वाचक रांगेमध्ये उपस्थित होते आणि १० वाजता उपक्रमाची सांगता झाली तेव्हा ९००० हून अधिक वाचकांनी सहभाग नोंदविला होता. पुंडलिक पै यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात सहभागी झालेल्या वाचनप्रेमींना बुक स्ट्रीटवरील त्यांच्या आवडीचे एक पुस्तक विनामूल्य देण्यात आले. या उपक्रमासाठी शनिवारी रात्री २५० कार्यकर्त्यांच्या मदतीने ७५००० पुस्तके मांडण्यात आली होती.
ST Gratuity Interest Scam : एसटी ग्रॅज्युइटी व्याज घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू
पुस्तकांच्या मदतीने साकारण्यात आलेली Find ur Book ही प्रतिकृती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष होते. सदर उपक्रमात शिवसेना आमदार राजेश मोरे , शिवसेना उप जिल्हाप्रमुख राजेश कदम , डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. बुक स्ट्रीट उपक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वाहतूक विभाग ठाणे, महाराष्ट्र पोलीस यांचे सहकार्य लाभले.
मोदी बागेत आज पवार कुटुंब एकत्र; राष्ट्रवादी विलीनीकरणावर शरद पवार घेणार मोठा निर्णय ?
