Both the wheels of the running ST bus came off : पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik highway) आंबेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. महामार्गावर धावणाऱ्या एसटी (ST) बसची दोन्ही मागची चाके निखळल्याने एकच खळबळ उडाली. चाकं निखळल्यानंतर एक चाक बसच्या पुढं तर दुसरं चाक हे रस्त्यालगतच्या नाल्यात पडलं. ही बस सुमारे 15 ते 20 मिनिटे चार चाकांवर धावत असल्याचे सांगण्यात आले. या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठ्या अपघाताचा अनर्थ (Accident disaster) टळला आणि बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील शेवाळेवाडी परिसरात लालपरीची दोन्ही मागची चाके अचानक वेगळी झाली. त्यावेळी ही एसटी बस रस्त्यावर धावत होती. सुमारे 15 ते 20 सेकंद बस रस्त्यावर धावत राहिली. बसचे एक चाक निखळले तर दुसरे चाक रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल नाल्यात पडले. त्यामुळं बस तिरकी होऊन रस्त्यावर धावत राहिली. त्यामुळं या बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. बसमधील सगळेच प्रवासी या घटनेने धास्तावले.
परळ आगाराची बस क्रमांक MH12 BL 3618 ही बस परळहून नारायणगावकडे जात होती. ही घटना आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी परिसरातील मोरेडे चॉकलेट कारखान्याजवळ घडली. एसटी बसचे चाक निखळल्याने बसमधील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
कोणताही दबाव नाही, निर्णय संविधानिक तरतूदींच्या आधारेच होणार, नार्वेकरांनी ठणकावून सांगितलं
या घटनेचा एक रोमांचक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये बसची दोन्ही चाके निखळल्यानंतर बस चारही चाकांवरून फिरत असल्याचे दिसत आहे. बस घासत गेल्यामुळं ठिणग्या उडत होत्या. मात्र, ही बाब चालकाच्या वेळीच लक्षात येताच त्याने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे एसटी बसची चाके अचानक सुटेपर्यंत चालक व वाहक काय करत होते? त्यांना बस तपासता आली नाही का? असा प्रश्न प्रवासी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.