Download App

मराठी भाषेचे वैभव वाढविणारे दिमाखदार भाषा भवन उभारावे – उद्धव ठाकरे

  • Written By: Last Updated:

मुंबई : केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल अशा स्वरूपाची मांडणी आणि रचना असलेले मराठी भाषा भवन (Marathi language building) व्हावे. मराठी भाषेला असलेला दोन हजार वर्षांचा इतिहास आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती यातून मिळावी. येणाऱ्या पिढ्यांना मराठीचे महत्व आणि थोरवी समजावी या हेतूने संकल्पित केलेले मराठी भाषा भवन ही वास्तू असली पाहिजे. ही वास्तू मुंबईच्या सौंदर्यात भर टाकून भाषेचे वैभव वाढविणारी असली पाहिजे अशी अपेक्षा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली.

विधान भवनात विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज बोलाविलेल्या विशेष बैठकीतला मार्गदर्शन करतांना उद्धव ठाकरे बोलत होते. या प्रस्तावित वास्तूची संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. ठाकरे यांनी यावेळी बोलताना सर्व मराठी भाषिक नागरिकांना मुंबईत आल्यावर या वास्तूला भेट द्यावी अशा पद्धतीने याची रचना झाली पाहिजे असे सांगितले. आपल्या मातृभाषेसाठी एकत्र काम करू या असे आवाहन करत त्यांनी मराठी भाषा भवनाच्या कामाबाबत काही सूचना देखील दिल्या.

Balasaheb Thorat : ‘आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत’; थोरांतांचा सत्ताधारी पक्षाला इशारा

यावेळी बोलताना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मराठी भाषेचे उपासक म्हणून आपण सर्वांनी मातृभाषेला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी आपण कार्यरत राहूया. महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि मराठी भाषेविषयी माहिती देणारे हे दालन असले पाहिजे.’

मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत सर्वांच्या सूचना स्वागतार्ह आहेत. यामध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले. या वास्तूच्या रचनेमध्ये आवश्यक बदल आणि नव्याने संरचना तयार करण्याबाबत त्यांनी संबंधिताना यावेळी सूचित केले. या बैठकित मराठी भाषा भवनाच्या तांत्रिक बाबींवरही चर्चा झाली.

या बैठकीला सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सचिन अहीर, आ. मनीषा कायंदे, आ. चेतन तुपे, आ. महादेव जानकर, आ. अनिकेत तटकरे, आ. अमोल मिटकरी, आ. निलय नाईक, आ. प्रसाद लाड, आ. धीरज देशमुख, आ. रामदास आंबटकर, आ. अजय चौधरी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, वास्तुविशारद पी. के. दास आदी उपस्थित होते.

Tags

follow us