Download App

Buldhana Bus Accident : ‘ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा’; अपघातानंतर राज ठाकरेंचा संताप

Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray On Buldhana Bus Accident )  यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, “बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय भीषण आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. ”

Accident : 26 जणांचा जीव घेणाऱ्या भागात सर्वाधिक अपघात; पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट का बनलाय?

तसेच महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे ड्रायव्हर्स आणि ट्र्क ड्रायव्हर तर कमालीच्या बेदरकारीने गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. अशा अपघातांच्या घटना परत कधीच होणार नाहीत ह्यासाठी आता प्रयत्न व्हायलाच हवेत.

दरम्यान, या अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा – पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट बनला आहे का? असा सवाल विचारला जात आहे. समृद्धी महामार्गावर हे ठिकाण धोकादायक का बनले याविषयी बुलढाणाचे माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना माहिती दिली. शिंगणे म्हणाले “ मी याच महामार्गाने प्रवास करतो. मला काही गोष्टी कायम खटकतात, त्या निदर्शनात आणतो. आता तर मी अधिवेशनात हा विषय मांडण्यासाठी माहिती गोळा करत आहे.”

Accident : 26 जणांचा जीव घेणाऱ्या भागात सर्वाधिक अपघात; पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट का बनलाय?

तसेच या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे घडलेली गाडीची दुर्घटना अतिशय दु:खद आहे. ज्या व्यक्तींचा या अपघातात मृत्यु झाला त्यांच्या कुटुंबियांविषयी मी संवेदना व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांनी 2 लाख रुपयांची मदत जारी केली असून जखमींना 50 हजार रुपयांची मदत जारी केली आहे. तसेच राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जारी केली आहे.

Tags

follow us