मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज दिल्लीत बैठक पार पडत आहे. ही बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. बैठकीत नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप गुलदस्त्यात असून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार यासंदर्भात चर्चा सुरु असून मंत्रिपदासाठी भाजप-शिंदे सरकारमधील अनेक दिग्गज नेत्यांची नावे समोर आली आहेत.
एकीकडे शिंदे गटातील आमदारांमध्ये अग्रगण्यी असलेले संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक यांच्यासह अपक्ष आमदार बच्चू कडू यांची नावे चर्चेत आली आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर आदी नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून शिंदे सरकार स्थापन झालं असून आत्तापर्यंत शिंदे-भाजप सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्रिमंडळ विस्तारात काही नेत्यांना मंत्रिपद देण्यात आली आहेत. त्याचवेळी ज्या नेत्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळालं नाही ते नाराज झाले असल्याचं बोललं जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे विद्यामान मंत्र्यामध्ये अस्वस्था निर्माण झालीय. या विस्तारात चांगली कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भाजपमध्ये काही संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. सोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील काही चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात आज झालेल्या बैठकीनंतरच कोणाला मंत्रिपद मिळणार? याबाबत स्पष्ट होणार आहे. अद्याप मंत्रिमंडळाच्या चर्चेबाबत अपडेट समोर आलेली नाही. राज्यातील अनेक नेत्यांनी मंत्रिमपदासाठी सेटिंग लावल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडं आपल्याला मंत्रिपद पाहिजेच असं काही नसल्याचं काही नेत्यांकडून सांगण्यात येतंय.
तसेच आम्ही मंत्रिपदासाठी नाहीतर बाळासाहेबांचा विचार घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचंही शिंदे गटाच्या आमदारांकडून बोललं जातंय. आगामी काळात कोणाला मंत्रिपद मिळणार? याचीच सर्वांना उत्सुकता लागलेली आहे.