Download App

निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल!

  • Written By: Last Updated:

Abdul Sattar : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना माहिती लपवणे भोवले आहे. विधानसभा निवडणणुक 2014 व 2019 प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहित समोर आल्याने अब्दुल अत्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been filed against Agriculture Minister Abdul Sattar for giving false information in the election affidavit!)

अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या काही मालमत्तांसंदर्भात खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी सिल्लोडचे सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी 2021 साली सत्तारांविरोधात याचिका दाखल केली होती. ता नंतर न्यायालयाने आदेश दिले. त्यावर पोलिसांनी अब्दुल सत्तार यांच्या मालमत्तेची तपासणी केली. त्यानंतर पोलीस तपासात सत्तारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचे समोर आले.

दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…

अब्दुल सत्तार यांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात मालमत्तेसंबंधी माहितीत तफावत असल्याचं मान्य करत सिल्लोडच्या न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. हे आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल. शिवाय 6 वर्ष निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील.

सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी याबाबत 27 ऑक्टोबर 2021 रोजी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयानं पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. पण त्यावर समाधान न झाल्यानं शंकरपल्ली यांनी दोन वेळा न्यायालयात धाव घेतली. तिसऱ्यांदा न्यायालयानं मुद्देनिहाय तपासाचे आदेश दिले. सत्तार यांचा जबाबही नोंदवला. 11 जुलै रोजी न्यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं मान्य करत फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहे.

Tags

follow us